हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी नारळ पाणी प्यावं की नाही? जाणून घ्या उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 03:31 PM2024-02-23T15:31:37+5:302024-02-23T15:31:58+5:30

काही लोक दिवसातून दोन वेळही नारळाचं पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही क्रोनिक डिजीज जसे की, हाय ब्लड प्रेशर असताना नारळ पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. 

Should people with high blood pressure drink coconut water or not? Know the answer... | हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी नारळ पाणी प्यावं की नाही? जाणून घ्या उत्तर...

हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी नारळ पाणी प्यावं की नाही? जाणून घ्या उत्तर...

High blood pressure :  नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतील. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात आणि अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो. बरेच लोक रोज नारळाचं पाणी पितात. काही लोक दिवसातून दोन वेळही नारळाचं पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही क्रोनिक डिजीज जसे की, हाय ब्लड प्रेशर असताना नारळ पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. 

हाय ब्लड प्रेशर असताना का पिऊ नये नारळ पाणी?

1) तसा तर हाय ब्लड प्रेशर (high blood pressure) च्या रूग्णांना नारळ पाणी पिण्याचा फायदा मिळतो. पण याचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्याव आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच याचं सेवन केलं पाहिजे.

2) नारळ पाणी नियमितपणे प्यायला हवं कारण यात पोटॅशिअम भरपूर असतं. यामुळे शरीराची पोटॅशिअमची गरज पूर्ण होते.

3) नारळ पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेलं एक्स्ट्रा आयर्न आणि सोडिअम लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं.

4) तुम्ही नारळ पाण्याचं सेवन कमजोरी दूर करण्यासाठीही करू शकता. याने तुम्हाला लगेच एनर्जी मिळते. याने ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदतही मिळते.

5) किडनीच्या आजाराने पीडित लोकांनी याचं सेवन टाळलं पाहिजे. यात आढळणारं पोटॅशिअम किडनी फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे या किडनीच्या रूग्णांनी याचं सेवन टाळलं पाहिजे.

6) ज्या लोकांचं ब्लड प्रेशर फार कमी आहे त्यांनीही नारळ पाण्याचं सेवन करू नये. बीपीच्या रूग्णांनी याचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच केलं पाहिजे. जर तुमजी एखादी सर्जरी होणार असेल तरीही तुम्ही नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.
 

Web Title: Should people with high blood pressure drink coconut water or not? Know the answer...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.