दात घासण्यापुर्वी पाणी प्यावे का? वाचा याचे फायदे आहेत का तोटे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 04:05 PM2022-07-17T16:05:59+5:302022-07-17T16:07:48+5:30
सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत (Drinking Water Before Brushing Teeth) याबद्दल माहिती देणार आहोत.
आपण आपल्या शरीराच्या स्वच्छतेची खूप काळजी घेत असतो. दात घासणे ही महत्वाच्या मूलभूत स्वच्छता सवयींपैकी एक आहे. तज्ज्ञ दिवसातून किमान दोनदा, एकदा उठल्यानंतर आणि एकदा झोपण्यापूर्वी दात घासण्याची शिफारस करतात. मात्र तुमचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी दात घासण्यापेक्षाही एक महत्वाची सवय तुम्ही स्वतःला लावून घ्यायला हवी.
सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत (Drinking Water Before Brushing Teeth) याबद्दल माहिती देणार आहोत.
आयुर्वेदामध्ये व्यक्तीला रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी पिऊन सकाळची सुरुवात करण्याचा सल्ला दिला जातो. योग प्रशिक्षक आणि होमिओपॅथिक डॉक्टर नुपूर रोहतगी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले, "सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर पाणी प्या, अगदी दात घासण्यापूर्वीच!"
दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचेही अनेक फायदे आहेत. पाणी आपल्याला केवळ हायड्रेटेड राहण्यासाठीच मदत करते असे नाही. तर शरीराचे तापमानदेखील नियंत्रित करते, किडनीमधील कचरा बाहेर टाकणे, लाळ तयार करणे आणि शरीराच्या विविध अवयवांना पोषक तत्वे पुरवणे. यासारखी शारीरिक कार्येदेखील करते.
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिण्याचे फायदे
- झोपेत असताना आपल्या तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. जेव्हा तुम्ही सकाळी पाणी पितात तेव्हा ते बॅक्टेरियादेखील तुमच्या पोटात जातात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
- सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन थांबते.
पावसात बाईक चालवताना या 5 चुका करू नका, नाहीतर बेतू शकतं जीवावर
- यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यासदेखील मदत होते.
- रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होऊन तोंडाचे आरोग्यही चांगले राहते. कारण पाणी रीहायड्रेट होण्यास मदत करते आणि लाळेच्या कमतरतेमुळे तोंड कोरडे होण्यापासून बचाव करते.