सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 11:42 AM2018-12-04T11:42:01+5:302018-12-04T15:41:19+5:30

सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषकतत्त्वं असतात. आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये सफरचंद हे फळ फायदेशीर मानले जाते.

Should you eat apple with or without peel? | सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये?

सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये?

googlenewsNext
ठळक मुद्देसफरचंदामध्ये शरीरासाठी पौष्टिक गुणधर्म असतात सफरचंदामुळे पचनप्रक्रिया सुधारतेशारीरिक समस्यांवर गुणकारी सफरचंद

शारीरिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. पण, चकाकणारे सफरचंद खाणे आरोग्यासाठी हानिकारक की फायदेशीर आहे, या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. जाणून घेऊया याचे उत्तर...
1. खाण्यापूर्वी सफरचंदाची साल काढावी का?
‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा’, अशी म्हण आहे. शक्यतो आपण सफरचंद त्याच्या सालासकटच खातो. पण हल्ली हल्ली फळांवर फवारण्यात येणारी कीटकनाशके आणि  फळांच्या आवरणाची चकाकी टिकून राहण्यासाठी त्यावर लावण्यात येणाऱ्या मेणाच्या लेपामुळे सध्या फळे सालासकट खावीत की नाही?, हा सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. फळांवर फवारण्यात येणारी कीटकनाशकं आणि मेणाचा थर आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असतात, ही बाब मान्य आहे. पण काही फळांच्या सालामध्येही पोषकतत्त्वे असतात, ही तत्त्वे टिकून राहावी, यासाठी कीटकनाशकं फवारणे आवश्यक असते ही गोष्टदेखील आपण विचारात घेतली पाहिजे. तरीही सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये?, हाच विचार अजूनही तुमच्या डोक्यात आहे का?. टेन्शन घेऊ नका. यासंदर्भात आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया...

2. सफरचंद कसे खावे? 
बहुतांश वेळा, सफरचंदावर कीटकनाशकं फवारलेली असतात, त्यामुळे ते तसेच खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सफरचंद खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवावे आणि एक तासासाठी पाण्यात भिजत ठेवावे. यानंतर त्यावरील कीटकनाशक काढण्यासाठी कोमट पाण्यात दोन ते तीन वेळा सफरचंद धुवावे. याद्वारे तुम्हाला फळांची खरी चव चाखता येते आणि शरीराला जास्तीत जास्त फायदेही मिळतात. 

3. सफरचंदाचे साल फायबरयुक्त
सफरचंदाचे साल हे फायबरयुक्त (तंतूमय पदार्थ) असते. सालासकट सफरचंदाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होतो. शिवाय, यामुळे तुम्हाला सारखी भूकदेखील लागत नाही आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत करते. 

4. जीवनसत्त्वाची मात्रा असते अधिक
सफरचंदाच्या सालामध्ये जीवनसत्त्व 'क' आणि 'अ' चे प्रमाण अधिक असते. एका सफरचंदाच्या सालामध्ये 8.4 mg जीवनसत्त्व 'क' आणि 98 IU जीवनसत्त्व 'अ' चे सरासरी प्रमाण असते. त्यामुळे सफरचंदाची साल काढून खाल्ल्यास नुकसान आपलेच आहे. कारण यामध्ये प्रचंड प्रमाणात असणारी जीवनसत्त्वंही आपण केराच्या टोपलीत फेकतो.

5. कर्करोग (Cancer) नियंत्रित करते 
सफरचंदाच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात Triterpenoid (ट्रायटरपेनॉइड) नावाचे पोषकतत्त्व असते. हे पोषकतत्त्व शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा खात्मा करतात. शिवाय, यामध्ये अॅन्टीऑक्सिडन्ट्सचेही प्रचंड प्रमाण असते, त्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

6.  श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुलभ होते 
सफरचंदाच्या सालामध्ये Quercetin (रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे तत्त्व) नावाचं फ्लॅव्हनॉईड असते. यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते.  जी लोक आठवड्यातून 5 किंवा त्याहून अधिक सफरचंद खातात, त्यांची श्वसनप्रणाली अधिक चांगल्या पद्धतीनं कार्य करते. 

7. वजन नियंत्रणात आणते 
जर तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं वजन घटवायचे असेल तर सालासकट सफरचंद खा. यामध्ये असलेले Ursolic अॅसिड लठ्ठपणाविरोधात लढते. यामुळे स्नायूंचे फॅट्स वाढतात पण कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. एकूणच वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

8. पोषकतत्त्वयुक्त सफरचंद
सफरचंदाच्या सालामध्ये पोटॅशिअम, कॅलशिअम, फॉलेट, लोह आणि फॉसफरस ही पोषकतत्त्वे असतात. शरीराचे सर्व कार्यपद्धती सुरळित पार पडावी, यासाठी ही पोषकतत्त्वे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात. 
 

Web Title: Should you eat apple with or without peel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.