उपवास करत असताना खाय खावे, काय खाऊ नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 10:54 AM2024-08-05T10:54:50+5:302024-08-05T11:30:39+5:30

Shrawan fasting : तुम्ही उपवास सोडता तेव्हा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, तुम्ही काय खावं आणि काय खाल्लं तर तब्येत बिघडू शकते.

Shrawan fasting : What to eat and not while shrawan fasting? | उपवास करत असताना खाय खावे, काय खाऊ नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

उपवास करत असताना खाय खावे, काय खाऊ नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

Fasting Diet Tips: श्रावणात बरेच लोक उपवास करतात. पहिल्यांदाच उपवास करणाऱ्या लोकांना हे माहीत नसतं की, उपवास सोडताना काय खावे आणि काय नाही. जेणेकरून तब्येत बिघडणार नाही. दिवसभर उपवास केल्यावर जेव्हा सायंकाळी तुम्ही उपवास सोडता तेव्हा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, तुम्ही काय खावं आणि काय खाल्लं तर तब्येत बिघडू शकते. हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उपवास सोडताना काय खावं?

- दिवसभर काही न खाता-पिता राहिल्याने सायंकाळी उपवास सोडताना सगळ्यात आधी केळी खावीत. केळींमध्ये पोटॅशिअम असतं, ज्यामुळे हे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरून राहतं आणि लवकर भूक लागत नाही.

- उपवास सोडताना तुम्ही बडीशेप आणि ओव्याचं पाणी पिऊ शकता. याने ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची आणि गॅसची समस्या होणार नाही.

- उपवास सोडताना तुम्ही ताक, फ्रूट चाट किंवा साबूदाण्याची खीरही खाऊ शकता.

- उपवास सोडण्यासाठी बटाटे एक चांगला पर्याय आहेत. बटाटा खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि एनर्जी मिळते.

- उपवास करताना बरेच लोक पाणी कमी पितात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. त्यामुळे उपवास सोडताना तुम्ही काकडी देखील खाऊ शकता.  याने शरीरात पाणी नियंत्रित राहील.

काय खाऊ नये?

- शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपवास करत असाल तर जास्त तळलेले, भाजलेले, मैद्याचे आणि बेसनाचे पदार्थ खाऊ नका.

- उपवासादरम्यान जास्त गोड पदार्थ खाणं टाळावे. कारण रिकाम्या पोटी गोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढू शकते.

- श्रावणात किंवा कोणत्याही उपवासात पांढऱ्या मिठाचा वापर करू नका. याऐवजी सैंधव मिठाचा वापर करा.

- उपवासादरम्यान जास्त तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नये. याने अ‍ॅसिडिटी, अपचन किंवा बद्धकोष्ठता अशा समस्या होतात.

- फळं आणि हिरव्या भाज्या खाताना काळजी घ्या. कारण पावसाळ्यात फळं आणि भाज्यांवर किटाणू असतात. ज्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. फळं-भाज्या चांगल्या साफ करून सेवन करा.
 

Web Title: Shrawan fasting : What to eat and not while shrawan fasting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.