मिरची जितकी तिखट, त्याचे दुष्परिणाम त्याहूनही तिखट! 'या' व्यक्तींनी तर ढुंकुनही बघु नये...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 02:26 PM2021-08-22T14:26:50+5:302021-08-22T14:30:03+5:30

मिर्चीचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. काही विशिष्ट आजारांच्या व्यक्तींनी मात्र र्चीचं सेवन पूर्ण टाळलं पाहिजे.

side effects of chilly, mirchi, people with some disease should not eat chilly | मिरची जितकी तिखट, त्याचे दुष्परिणाम त्याहूनही तिखट! 'या' व्यक्तींनी तर ढुंकुनही बघु नये...

मिरची जितकी तिखट, त्याचे दुष्परिणाम त्याहूनही तिखट! 'या' व्यक्तींनी तर ढुंकुनही बघु नये...

googlenewsNext

काहींना तिखट खाण्यास फार आवडतं. अशा लोकांना जेवणात देखील मिर्ची खाण्याची सवय असते. मिर्ची केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील लाभदायक ठरते. मात्र मिर्चीचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. काही विशिष्ट आजारांच्या व्यक्तींनी मात्र र्चीचं सेवन पूर्ण टाळलं पाहिजे.

दम्याचे रुग्ण
जास्त प्रमाणात मिरच्यांचं सेवन केल्याने दम्याचा अटॅक येऊ शकतो. म्हणून, जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा कोणत्याही श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुम्ही मिरच्या, विशेषत: लाल मिरच्यांचं सेवन करणं टाळावं.

बद्धकोष्ठता
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी मिरच्यांचं सेवन अजिबात सेवन करू नये. अन्यथा ही समस्या मुळव्याधाचं रूप धारण करते. याशिवाय ज्यांना आधीच मूळव्याधची समस्या आहे त्यांच्यासाठी मिरचीचे सेवन धोकादायक ठरतं. यामुळे समस्या अधिक वाढू शकते.

त्वचेच्या समस्या
स्कीन संदर्भात तक्रार असलेल्या व्यक्तींनीही मिरच्यांचं सेवन करणं टाळावं. ज्या लोकांना त्वचेची समस्या आहे किंवा बऱ्याचदा त्वचेवर पुरळ, खाज सुटणं या तक्रारी असतात त्यांनी मिरचीचं सेवन करू नये. हिरव्या मिरचीत कॅप्सेसीन असतं जे त्वचेच्या समस्या आणखी वाढवते.

अल्सर
ज्या लोकांना पोटात अल्सरची समस्या आहे, अशा लोकांनी मिरचीचं सेवन करून नये. मिरची खाल्ल्याने जखमा अधिक खोल होतात आणि समस्या खूप गंभीर बनते.

अ‍ॅसिडीटी
ज्या लोकांना अ‍ॅसिडीटीची समस्या आहे, त्यांनी मिरची खाणं टाळलं पाहिजे. विशेषत: लाल मिरची अजिबात खाऊ नये. अन्यथा पोटात जळजळ होण्याची समस्या आणि अ‍ॅसिडीटी जास्त वाढते. या व्यतिरिक्त, जे लोक जास्त मिरची खातात त्यांना अतिसाराची समस्या देखील असते

Web Title: side effects of chilly, mirchi, people with some disease should not eat chilly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.