लिंबूपाण्याचे फायदे नव्हे 'हे' तोटे जाणून घ्याच! अन्यथा कायमचे बळावतील अतिघातक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 03:55 PM2021-10-01T15:55:34+5:302021-10-01T15:59:34+5:30

लिंबूपाण्याचे उपयोग अनेक आहेत. परंतु, लिंबू-पाणी पिण्यामुळे काही तोटे देखील होऊ शकतात. तुम्ही दररोज जास्त प्रमाणात लिंबूपाण्याचे सेवन करत असाल तर तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

side effects of drinking lemon water | लिंबूपाण्याचे फायदे नव्हे 'हे' तोटे जाणून घ्याच! अन्यथा कायमचे बळावतील अतिघातक आजार

लिंबूपाण्याचे फायदे नव्हे 'हे' तोटे जाणून घ्याच! अन्यथा कायमचे बळावतील अतिघातक आजार

googlenewsNext

वजन कमी करणे असो, ताजेतवाने वाटणे असो किंवा त्वचेच्या उजळपणासाठी असो, लिंबूपाण्याचे उपयोग अनेक आहेत. परंतु, लिंबू-पाणी पिण्यामुळे काही तोटे देखील होऊ शकतात. 'अति तेथे माती' ही म्हण सर्वत्र लागू ठरते, त्यानुसार जर काहीही जास्त प्रमाणात घेतले गेले तर ते समस्या निर्माण करू शकते. त्यामुळं, जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात लिंबूपाण्याचे सेवन करत असाल तर तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

जास्त लिंबूपाणी ( lemon water) पिण्याचे तोटे

  • जर एखादी व्यक्ती दररोज आणि वारंवार लिंबूपाणी पित असेल तर ते नुकसानकारक ठरते. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या काही इतर समस्यांना सामोरे जावे लागते.
  • लिंबू नैसर्गीकरित्या आम्लीय आहे, म्हणून त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांचे आरोग्य बिघडू शकते. आपल्या दातांचा संरक्षणात्मक स्तर खराब होऊ शकतो. ज्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात..
  • अनेक संशोधनांमधून हे उघड झाले आहे की, लिंबूपाण्याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होऊ शकते. त्याच वेळी यामुळे पोटाच्या आतील आवरणालाही नुकसान होऊ शकते.
  • लिंबू पाणी ऊर्जा देते, परंतु कोमट पाण्यात लिंबूचा जास्त वापर केल्याने वारंवार लघवी होऊ शकते. यामुळे, आपल्या शरीरातून जास्त प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स आणि सोडियम बाहेर टाकले जाते.
  • लिंबातील आम्ल हाडांसाठी देखील हानिकारक ठरू शकते. म्हणूनच लिंबाचा जास्त वापर टाळावा.
  • लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी असते, जे शरीरातील लोहाचे शोषण वाढवते. पण व्हिटॅमिन-सीच्या जास्त प्रमाणामुळे शरीरातील लोहाची पातळी देखील वाढू शकते, ज्यामुळे वेगळ्याच समस्या निर्माण होऊ शकतात

Web Title: side effects of drinking lemon water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.