तोच चहा पुन्हा गरम करून पिताय? मग तयार राहा 'या' कायमस्वरुपी बळावणाऱ्या गंभीर आजारांना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:14 PM2021-09-14T13:14:07+5:302021-09-14T13:14:07+5:30

आपण बऱ्याच वेळा सारखा चहा तयार करण्यासाठी आळस करतो. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात चहा तयार करून ठेवला जातो.मग,  तो एकदाच तयार केलेला चहा आपण दिवसातून अनेक वेळा गरम करून पितो. पण तुम्हाला माहित आहे का की पुन्हा पुन्हा गरम चहा करून पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

side effects of drinking reheated tea, do not drink reheated tea again and again | तोच चहा पुन्हा गरम करून पिताय? मग तयार राहा 'या' कायमस्वरुपी बळावणाऱ्या गंभीर आजारांना

तोच चहा पुन्हा गरम करून पिताय? मग तयार राहा 'या' कायमस्वरुपी बळावणाऱ्या गंभीर आजारांना

Next

आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने करतात. आपल्यापैकी अनेकांचा दिवस चहाशिवाय सुरुच होऊ शकत नाही. चहा पिल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. चहामुळे आपली ऊर्जा वाढते. ऑफिसमध्ये कामाचा थकवा दूर करण्यासाठी अनेकदा चहा प्यायला जातो. मात्र काही लोकांना आवश्यकतेपेक्षा जास्त चहा पिण्याची सवय असते. 

आपण बऱ्याच वेळा सारखा चहा तयार करण्यासाठी आळस करतो. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात चहा तयार करून ठेवला जातो.मग,  तो एकदाच तयार केलेला चहा आपण दिवसातून अनेक वेळा गरम करून पितो. पण तुम्हाला माहित आहे का की पुन्हा पुन्हा गरम चहा करून पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

चव आणि वाईट वास
चहा पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याची चव आणि सुगंध नष्ट होतो. या दोन्ही गोष्टींशिवाय चहाची मजा ती काय! याशिवाय, चहा पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याlतील पोषक घटकही कमी होतात.

जीवाणूंची वाढ
एकदाच चहा तयार करून पुन्हा पुन्हा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण चहामध्ये सूक्ष्मजीव तयार होऊ लागतात. हे सौम्य जीवाणू आरोग्यासाठी हानिकारक असतात. ज्या घरांमध्ये दुधाचा चहा बनवला जातो त्यामध्ये सूक्ष्मजीवांचा धोका अधिक वाढतो. तसेच, हर्बल चहा वारंवार गरम केल्याने त्याचे पोषक घटक नष्ट होतात.

आरोग्यासाठी हानिकारक
एकदाच तयार केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिणे आरोग्यासाठी घातक आहे. कारण त्यात असलेले पोषक तत्व संपतात. जर तुम्ही ही सवय बदलली नाही तर बराच वेळानंतर पोटदुखी, जळजळ होऊ शकते. ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

चहाशी संबंधित या गोष्टी जाणून घ्या

  • जर तुम्ही १५ मिनिटांनी तोच चहा गरम करुन प्यायलात तर त्यामुळे तुम्हाला हानी पोहोचत नाही.
  • बराच वेळानंतर चहा परत गरम करून पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
  • चहा नेहमीच ताजा तयार करा आणि गरम असताना लगेचच प्या.

Web Title: side effects of drinking reheated tea, do not drink reheated tea again and again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.