रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध, पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 11:30 AM2019-04-27T11:30:05+5:302019-04-27T11:35:14+5:30
नव्या दिवसाची सुरुवात असो, नव्या नात्याची सुरुवात असो, आळस दूर करायचा असो किंवा सहज गप्पा मारायच्या असोत यात एक कप चहा सर्वांनाच हवा असतो.
(Image Credit : Momspresso)
नव्या दिवसाची सुरुवात असो, नव्या नात्याची सुरुवात असो, आळस दूर करायचा असो किंवा सहज गप्पा मारायच्या असोत यात एक कप चहा सर्वांनाच हवा असतो. पण जर तुम्ही जर त्या लोकांपैकी आहात ज्यांच्या चहा घेतल्याशिवाय दिवसच उगवत नाही आणि तुम्ही बेड टी चाहते असाल तर वेळीच सावध व्हा. चहामध्ये कॅफीनसोबतच एल-थायनिन आणि थियोफायलिन असतं ज्याने तुम्हाला फ्रेश तर वाटतं पण याचे काही गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात.
मळमळ आणि अस्वस्थता
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पित्त रस तयार होण्याच्या आणि काम करण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडतो. या कारणाने मळमळ होऊ शकते आणि घाबरल्यासारखंही वाटू शकतं.
(Image Credit : Video Blocks)
अल्सरचं धोका
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अल्सर आणि हायपर अॅसिडिटी होण्याचा धोका असतो. कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटाच्या आतील बाजूस जखम होण्याची शक्यताही वाढते.
पोट फूगण्याची शक्यता
असे मानले जाते की, ब्लॅक टी आरोग्यासाठी चांगला असतो आणि याने वजनही कमी होतं. पण रिकाम्या पोटी ब्लॅक टी प्यायल्याने पोट फूगतं आमि भूकही लागत नाही.
(Image Credit : Bustle)
मूड-स्विंगची समस्या
रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्याने लवकर थकवा जाणवतो. तसेच मूड-स्विंगची समस्याही वाढू लागते.
हाडांची समस्या
रिकाम्या पोटी चहाने स्केलेटल फ्लोरोसिस नावाचा आजार होऊ शकतो. या आजाराने शरीराच्या आतल्या आतल्या समस्या वाढतात. या आजाराने शरीरात आर्थरायटिससारख्या वेदना होऊ लागतात.
जास्त चहा प्यायल्याने नुकसान
- दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.
- आयर्न अब्जॉर्ब केल्याने शरीराची क्षमता कमी होऊ लागते.
- कॅफीनचं अधिक प्रमाण असल्याने चहाची सवय लागू शकते.
- जास्त चहा प्यायल्याने पचनक्रियेत समस्या येऊ शकते.
- रात्री उशीरा चहा प्यायल्यास झोप न येण्याची समस्या होऊ शकते.