फणसाच्या बिया खाण्याचे दुष्परीणामही; 'या' रुग्णांनी तर खाऊच नयेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 06:56 PM2021-05-26T18:56:18+5:302021-05-26T18:57:29+5:30
फणसाच्या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट,आरोग्याठी फायदेशीर तितक्याच आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत.
उन्हाळ्यात फणस फार आवडीने खाल्ला जातो. फणस खाण्याचे भरपूर फायदेही आहेत. फणसात व्हिटॅमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असतं. हे सर्व घटक उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. या फणसामध्ये आणखी एक गोष्ट दडलेली असते जी फणसाच्या गऱ्यांइतकीच चवदार लागते. ती सुकवतात. त्या उकडूनही खाल्ल्या जातात आणि त्याची भाजीही केली जाते. इतर भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. त्या म्हणजे फणसाच्या बिया. या खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तर कमी होतेच. शिवाय अशक्तपणा कमी होतो. मात्र, जितक्या या खायला चविष्ट तसंच आरोग्याठी फायदेशीर तितक्याच आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत.
ब्लडप्रेशर कमी होण्याची शक्यता
फणसाच्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तदाब कमी होतो. लो बीपी असणाऱ्यांनी फणसाच्या बिया खाणे टाळावे. तर ज्या लोकांना हाय बीपी आहे ते रक्तदाब कमी करण्यासाठी औषध खातात. त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. या बिया खाल्ल्याने त्यांचा रक्तदाब कमी होईल
साखरेची पातळी कमी होते
फणसाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. जर एखाद्या व्यक्तीला हायपोग्लाइसीमिया असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच फणसाच्या बिया आहारात घ्याव्यात.
रक्त पातळ होते
रक्त गोठल्यामुळे बरेच लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशा लोकांनी चुकूनही आहारात फणसाच्या बिया घेऊ नयेत. कारण जे आधीच रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खात आहेत त्यांनी फणसाच्या बिया खाल्ल्याने रक्त आणखी पातळ होण्याची शक्यता असते. ज्या लोकांना चयापचयची समस्या आहे अशांनी तर फणसाच्या बिया खाणे टाळावेच.
फणसाच्या बिया खाण्याचे फायदे
- व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी आवश्यक पोषक आहे. व्हिटॅमिन ए असल्याने आपले केसही चांगले राहतात. फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, बी ६, सी असते. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
- चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फणसाच्या बियांचा वापर करावा. सर्वात अगोदर या बिया दूधात भिजवून ठेवाव्यात आणि नंतर बारीक पेस्ट करून चेहऱ्याला दररोज लावावी. किमान २५ मिनिटे तरी ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवावी आणि नंतर पाण्याने धूवून टाकावी. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.