'या' लोकांनी जाभूंळ शिवूही नये, आहेत इतके दुष्परिणाम की आयुष्यात जांभूळ खाणं विसरून जाल..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 11:10 AM2021-08-15T11:10:39+5:302021-08-15T11:15:15+5:30

जांभूळ औषध म्हणून वापरलं जातं. परंतु आपल्याला माहिती आहे का? काही लोकांसाठी जांभूळ हानिकारक असतं. अशा लोकांनी जांभळाचं सेवन करू नये.

side effects of eating jamun, people with some diseases should not eat jamun, know more | 'या' लोकांनी जाभूंळ शिवूही नये, आहेत इतके दुष्परिणाम की आयुष्यात जांभूळ खाणं विसरून जाल..

'या' लोकांनी जाभूंळ शिवूही नये, आहेत इतके दुष्परिणाम की आयुष्यात जांभूळ खाणं विसरून जाल..

googlenewsNext

आपल्यापैकी अनेकांना जांभूळ खायला आवडतं. शिवाय जांभूळ हे आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतं. मुख्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जांभूळ फार उपयोगी ठरतं. अशक्तपणा दूर करण्यासाठी या फळाचा वापर केला जाऊ शकतो. मात्र अति प्रमाणात जांभूळाचं सेवन करणं आरोग्यावर परिणाम करतं. आयुर्वेदानुसार जांभूळ औषध म्हणून वापरलं जातं. परंतु आपल्याला माहिती आहे का? काही लोकांसाठी जांभूळ हानिकारक असतं. अशा लोकांनी जांभळाचं सेवन करू नये.

बद्धकोष्ठता
जांभळामध्ये सी व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. शिवाय फायबरची मात्रा चांगली असते. परंतु जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच खावेत.

चेहऱ्यावर पुरळ येणं
जर तुमची त्वचा ऑयली म्हणजे तेलकट असेल आणि पुरळ येण्याची समस्या असेल तर आपण जांभळाचं सेवन करणं टाळावं. जांभूळ खाल्ल्यामुळे पुरळ येण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे त्याचे अधिक सेवन करणं आरोग्यास हानिकारक आहे.

उलट्या
जांभूळ खाल्ल्यानंतर बर्‍याच लोकांना उलट्यांचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला २ ते ३ जांभूळ खा. जर तुम्हाला ते पचले तरच त्याचे सेवन करा.

ब्लड शुगर
आयुर्वेदात ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी जांभळाच्या बियांची पावडर तसंच जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेकदा लोकं आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात याचं सेवन करतात. त्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका उद्भवू शकतो.

 

Web Title: side effects of eating jamun, people with some diseases should not eat jamun, know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.