हेअर ट्रान्सप्लांट करताय? मग हे दुष्परिणाम वाचाच, काळजी न घेतल्यास अधिकच गळतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 05:06 PM2021-08-19T17:06:14+5:302021-08-19T17:08:37+5:30

हेअर ट्रान्सप्लांट या प्रक्रियेत गुंतागुंती होऊ शकतात. या गुंतागुंती सगळ्यांमध्ये सारख्याच असतील असे नाही. मात्र यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करणऱ्या व्यक्तीला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

side effects of hair transplant | हेअर ट्रान्सप्लांट करताय? मग हे दुष्परिणाम वाचाच, काळजी न घेतल्यास अधिकच गळतील केस

हेअर ट्रान्सप्लांट करताय? मग हे दुष्परिणाम वाचाच, काळजी न घेतल्यास अधिकच गळतील केस

googlenewsNext

डोक्यावरचे केस गेल्यामुळे अनेकजण त्रस्त असतात. चूकीचा आहार आणि चूकीची जीवनशैली यामुळे केस विरळ होतात अन् काही वेळा टक्कल पडते. हेअर ट्रान्सप्लांट या प्रक्रियेत गुंतागुंती होऊ शकतात. या गुंतागुंती सगळ्यांमध्ये सारख्याच असतील असे नाही. मात्र यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करणऱ्या व्यक्तीला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. डॉक्टर अभय सिंह यांनी ओन्लीमायहेल्थ या संकेतस्थळाला याचे दुष्परिणाम सांगितले आहेत.

  • केस विरळ होणे: हेयर ट्रान्स प्लांट करून घेतलेल्या काही लोकांच्या बाबतीत असे आढळून आले की आधीच्या पेक्षा त्यांचे केस विरळ झाले आहेत.  ही स्थिती हेअर ट्रान्स्पांटनंतर उद्भवते. ही स्थिती ऑपरेशन नंतरचा धक्का ह्या कारणाने उद्भवते आणि सर्जरीच्या काही महिन्यानंतर केसांचा घनदाटपण मूळ पदावर येतो.
  • रक्तस्त्राव: हेयर ट्रान्स प्लांटचा दुष्परिणाम म्हणून काहीवेळेला जास्त रक्तस्त्राव  होतो. उपचार केलेल्या जागेवर जास्त भर देण्याने पण रक्तस्त्राव होतो. तरीही जर रक्तस्त्राव थांबत नसेल तर मात्र ही गंभीर बाब समजून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • वेदना : ह्या प्रक्रियेमध्ये वेदना असतात . डॉक्टर बऱ्याच पेशंटना सौम्य वेदनाशामक लिहून देतात जे वेदना कमीत कमी करतात आणि पेशंटला आराम मिळतो.
  • खाज :खाज सुटणे हा आणखी दुष्परिणाम आहे जो विशेषत: ट्रान्सप्लांट केलेल्या जागेवर येतो. हे जखमेवरील खपल्यांमुळे होते थोड्या दिवसात त्या काढाव्या लागतात. आणि हा प्रोब्लेम घालविण्या साठी स्काल्प सौम्य शाम्पूने नियमितपणे धुवावा लागतो.
  • बधिरपण :नव्याने ट्रान्सप्लांट झालेला भाग काही दिवस ते काही आठवडे पर्यंत बधिर होतो. परंतु हे तात्पुरते असते.
  • जंतूसंसर्ग: क्वचितच हेयर ट्रान्स प्लांट सर्जरीमध्ये जंतु संसर्ग होतो कारण हेअर ट्रान्सप्लांच प्रक्रियेच्या आधी आणि नंतर जी औषधे दिली गेली असतात त्यामुळे शक्यता असते. तसेच उपचार केलेल्या जागेची योग्य ती स्वछता बाळगली नाही तर हा जंतूसंसर्ग वाढू शकतो.
  • गाठ :केस ट्रान्स प्लांट केलेल्या जागेवर, गाठ उद्भवू शकते. पण ही अवस्था फक्त काही आठवडेच राहते. ही गाठ पुळीसारखी किंवा त्याही पेक्षा लहान असते.
  • व्रण राहणे : केलोईड स्कॅरिंग म्हणजे केलोईड व्रण हे हेयर ट्रान्स प्लांट सर्जरीमध्ये येऊ शकतात. काही पेशंट मध्ये व्रण येतात जे नंतर डोक्यात खच पडल्यासारखे दिसतात.

Web Title: side effects of hair transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.