कोरोनाकाळातील 'डुमस्क्रोलिंग'मुळे लोक नैराश्याच्या गर्तेत, तुम्ही याचे शिकार नाही ना? घ्या तपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:56 PM2021-11-08T14:56:37+5:302021-11-08T17:28:49+5:30

कोरोनाच्या काळात नकारात्मक संदेश, कथांचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं संशोधकांना आढळलंय. सोशल मीडियावर फक्त दोन मिनिटे घालवल्यानं तुमचा संपूर्ण दिवस वाया जाऊ शकतो आणि दिवसभर तुमचा मूड खराब होऊ शकतो. यूकेच्या एसेक्स युनिव्हर्सिटीच्या (Essex University) सोशल मीडियासंदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनात ही तथ्यं समोर आली आहेत.

side effects on mental health due to doomscrolling during corona | कोरोनाकाळातील 'डुमस्क्रोलिंग'मुळे लोक नैराश्याच्या गर्तेत, तुम्ही याचे शिकार नाही ना? घ्या तपासून

कोरोनाकाळातील 'डुमस्क्रोलिंग'मुळे लोक नैराश्याच्या गर्तेत, तुम्ही याचे शिकार नाही ना? घ्या तपासून

googlenewsNext

बाहेरच्या जगाच्या नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी घरीच राहणं चांगलं आहे, असं अनेकवेळा वाटतं, परंतु, आजच्या युगात घरात राहूनही तुम्ही बाहेरच्या जगापासून दूर राहू शकत नाही. कारण, तुमचं एक रूप तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल जगातही (Virtual World) फिरत असतं. सोशल मीडियावर फक्त दोन मिनिटे घालवल्यानं तुमचा संपूर्ण दिवस वाया जाऊ शकतो आणि दिवसभर तुमचा मूड खराब होऊ शकतो.

यूकेच्या एसेक्स युनिव्हर्सिटीच्या (Essex University) सोशल मीडियासंदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनात ही तथ्यं समोर आली आहेत. कोरोनाच्या काळात नकारात्मक संदेश, कथांचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं संशोधकांना आढळलंय. लोकांनी ट्विटर आणि यूट्यूबवर नकारात्मक बाबी पाहिल्या, तेव्हा ते उदास झाले. इथं एक धक्कादायक ट्रेंडदेखील उदयास आला. वास्तविक, जेव्हा लोकांना कोरोनाशी संबंधित नकारात्मक आणि सकारात्मक बातम्या वाचण्यास देण्यात आल्या, तेव्हा त्यांना नकारात्मक कथांमुळं जास्तच नैराश्य आलं. त्याच वेळी जेव्हा सकारात्मक कथा वाचायला दिली गेली, तेव्हा त्याचा त्याच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही.

काय आहे डूम स्क्रोलिंग? (Doomscrolling)
सोशल मीडियावर कोरोनाशी संबंधित नकारात्मक बातम्यांचा मनावर अधिक नकारात्मक परिणाम होत असल्याचं संशोधकांना आढळलं आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. कॅथरीन बुकानन (Kathryn Buchanan) सांगतात की, नकारात्मक सोशल मीडियाला डूमस्क्रोलिंग (Doomscrolling) म्हणतात. यामध्ये, स्टोरीच्या माध्यमातून यूजर्सना अशी फीड दिली जाते, जेणेकरून ते जास्तीत जास्त वेळ त्यांच्या स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपवर नकारात्मक कथा, बातम्या वाचत राहतील.

डॉ कॅथरीन पुढे म्हणाल्या की, सोशल मीडियावर नकारात्मक बातम्यांचा ट्रेंड वाढत आहे. अनेकदा या न्यूज फीडमध्ये सत्यताही (authenticity) नसते. अशा परिस्थितीतही लोक त्यांना मिळणारे ऑनलाइन फीड वाचत राहतात. हे आरोग्यासाठी चांगलं नाही.

Web Title: side effects on mental health due to doomscrolling during corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.