Video : "कोरोना लशीचे किरकोळ साईड इफेक्ट; नपुंसकत्वाची चर्चा निव्वळ बकवास!"
By manali.bagul | Published: January 3, 2021 01:07 PM2021-01-03T13:07:24+5:302021-01-03T13:12:44+5:30
CoronaVaccine News & Latest Updates: भारत बायोटेक या स्वदेशी लशीच्या मानवी चाचणीचे अहवाल देखील चांगले आले असून ती परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. नुकतीच कोरोनाच्या दोन लशींना DCGI कडून परवानगी मिळाली आहे. या लशीमध्ये स्वदेशी लसींचा समावेश आहे. आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड लस आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनापेक्षाही गंभीर परिणामांचा सामाना करावा लागेल अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे लसीबाबत लोकांच्या मनात धाकधुक होती. डॉ. व्ही. जे. सोमानी यांनी कोरोना लसीच्या साईड इफे्क्टबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
व्ही. जी. सोमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतातील दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी एक लस संपूर्ण स्वदेशी आहे. भारत बायोटेक या स्वदेशी लशीच्या मानवी चाचणीचे अहवाल देखील चांगले आले असून ती परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे.
#WATCH I We'll never approve anything if there's slightest of safety concern. Vaccines are 110 % safe. Some side effects like mild fever, pain & allergy are common for every vaccine. It (that people may get impotent) is absolute rubbish: VG Somani,Drug Controller General of India pic.twitter.com/ZSQ8hU8gvw
— ANI (@ANI) January 3, 2021
गंभीर साईड इफेक्ट्स असलेल्या लसीच्या वापरासाठी देण्यात आलेली नाही. सुरक्षिततेच्या बाबतीत थोडी जरी शिंका असल्यास आम्ही कधीही मंजूरी देणार नाही. लस ११० टक्के सुरक्षित आहे. सौम्य ताप, वेदना आणि एलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य आहेत. अशी माहिती व्ही. जी. सोमानी यांनी दिली आहे. दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR
Vaccines of Serum Institue of India and Bharat Biotech are granted permission for restricted use in emergency situation: DCGI pic.twitter.com/fuIfPQ9i7B
— ANI (@ANI) January 3, 2021
भारत बायोटेक या स्वदेशी लशीच्या मानवी चाचणीचे अहवाल देखील चांगले आले असून ती परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे. या दोन्ही लशी दोन ते आठ डिग्री सेल्सिअसमध्ये ही लस स्टोअर करावी लागणार असल्याची माहिती देखील व्ही. जी. सोमानी यांनी दिली आहे. काळजी वाढली! हिवाळ्यात दारूचं सेवन ठरू शकतं जीवघेणं; हवामान विभागाचा धोक्याचा इशारा