मुलतानी मातीचे फायदे ठाऊक असतील पण हे तोटे वाचाल तर मुलतानी मातीचं नावच विसरुन जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 05:25 PM2021-10-11T17:25:30+5:302021-10-11T17:34:58+5:30

चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात.

Side effects of multani mitti, preganant woman should not eat multani mitti | मुलतानी मातीचे फायदे ठाऊक असतील पण हे तोटे वाचाल तर मुलतानी मातीचं नावच विसरुन जाल

मुलतानी मातीचे फायदे ठाऊक असतील पण हे तोटे वाचाल तर मुलतानी मातीचं नावच विसरुन जाल

googlenewsNext

चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात. मुलतानी माती बारीक सिलिकेट आणि अनेक खनिजांपासून बनवली जाते. सुंदर त्वचा, गुळगुळीत आणि चमकदार केस मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. काही लोक आम्लीयता/पित्तासारख्या काही आजारांवर उपचार करण्यासाठी मुलतानी मातीचं सेवन करतात (पोटात घेतली जाते). परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असं करणं योग्य नाही. त्यात अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि सिलिकेट, चिकणमाती, खनिजे, शिवाय अतिरिक्त घटकही उच्च दर्जाचे असतात. तरीही ते हानी करू शकते.

मुलतानी मातीचे दुष्परिणाम
मुलतानी माती कोरड्या त्वचेसाठी किंवा अत्यंत संवेदनशील त्वचेसाठी चांगली नाही. उच्च शोषक शक्तीमुळे ती आपली त्वचा कोरडी करू शकते. मात्र, कोरड्या त्वचेवर होणारे त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी बदाम आणि दूध मिसळता येतं. त्याऐवजी कोरड्या त्वचेवर काओलीन चिकणमाती वापरून पाहता येईल.

मुलतानी मातीच्या फेस पॅकचे दुष्परिणामही समोर आले आहेत. याच्यामुळं सहसा आपली त्वचा कोरडी होते. म्हणजेच, आपल्या त्वचेतील ओलावा कमी होतो, ही बाबही लक्षात घेणं आवश्यक आहे.

फुलरच्या चिकणमातीतही उच्च शीतकरण गुणधर्म असतात. यामुळं श्वासोच्छवासाला अडथळा जाणवू शकतो. विशेषतः जेव्हा ही माती उच्च तापासह सनबर्नपासून आराम मिळवण्यासाठी वापरली जाते, तेव्हा हा दुष्परिणाम जाणवू शकतो.

गरोदरपणात मुलतानी माती खाणं सुरक्षित नाही. यामुळे काही गंभीर आरोग्याच्या आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळं आतड्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. हे बाळाला आणि आईलाही हानी पोहोचवू शकते. म्हणूनच तुम्ही गरोदर असाल तर, मुलतानी माती खाण्याची चूक करु नका.

Web Title: Side effects of multani mitti, preganant woman should not eat multani mitti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.