कोणत्या स्थितीमध्ये करू नये ओव्याचं सेवन, जाणून घ्या काय होतात समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:23 PM2024-08-13T15:23:17+5:302024-08-13T15:24:12+5:30

Carrom seed side effects : याचे अनेक फायदे असले तरी एक्सपर्ट्स उन्हाळ्यात ओव्याचं सेवन न करण्याचा सल्ला देतात.

Side Effects of Ajwain or carom Seeds You Must Read | कोणत्या स्थितीमध्ये करू नये ओव्याचं सेवन, जाणून घ्या काय होतात समस्या!

कोणत्या स्थितीमध्ये करू नये ओव्याचं सेवन, जाणून घ्या काय होतात समस्या!

Carrom seed side effects : ओव्याचं सेवन जास्तीत जास्त लोक मुखवास म्हणून करतात. तसेच वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठीही ओव्याचा वापर केला जातो. ओवा आपल्या पचनक्रियेच्या गुणांसाठीही ओळखला जातो. पचनासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास ओव्याने मदत मिळते. ओव्यामध्ये फायबर, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. याचे अनेक फायदे असले तरी एक्सपर्ट्स उन्हाळ्यात ओव्याचं सेवन न करण्याचा सल्ला देतात. असा सल्ला का दिला जातो आणि कोणत्या स्थितींमध्ये ओव्याचं सेवन करू नये, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

ओवा हा खूप गरम असतो. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त ओवा न खाण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्यास पोटासंबंधी आणि पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

कधी खाऊ नये ओवा?

- जर तुमचं तोंड आलं असेल म्हणजे तोंडात फोड झाले असतील तर या स्थितीत ओव्याचं सेवन करू नये.

- गर्भवती महिलांनी सुद्धा ओवा खाणं टाळलं पाहिजे. याने आई आणि बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. 

- त्याशिवाय ज्या लोकांना लिव्हरसंबंधी समस्या आहे, त्यांनीही ओवा खाणं टाळलं पाहिजे. ओवा खाल्ल्याने स्थिती आणखी बिघडू शकते.

- उन्हाळ्यात जर ओव्याचं सेवन जास्त केलं तर जुलाब, उलटी किंवा पोटासंबंधी समस्या होण्याचा जास्त धोका असतो. 

- ओव्याच्या सेवनाने एखाद्या व्यक्तीला स्कीनच्या एलर्जीची समस्या होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे उन्हाळ्यात याचं अधिक सेवन करू नये.

Web Title: Side Effects of Ajwain or carom Seeds You Must Read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.