कोणत्या स्थितीमध्ये सफरचंदाचं सेवन करणं ठरू शकतं नुकसानकारक? वेळीच व्हा सावध...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:05 PM2024-09-04T13:05:33+5:302024-09-04T13:12:18+5:30
एका निरोगी व्यक्तीने जर सफरचंदाचं सेवन नियमितपणे केलं तर त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता फार कमी असते. मात्र, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.
When Not To Eat Apple : सफरचंद हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर फळ मानलं जातं. डॉक्टरही अनेक निरोगी राहण्यासाठी, हृदय हेल्दी ठेवण्यासाठी आणि अनेक पोषक तत्व मिळवण्यासाठी नियमितपणे सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात. कारण सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशिअमसहीत अनेक पोषक तत्व असतात.
एका निरोगी व्यक्तीने जर सफरचंदाचं सेवन नियमितपणे केलं तर त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता फार कमी असते. मात्र, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तसेच सफरचंदाचेही काही साईड इफेक्ट्स असतात. काही स्थितींमध्ये सफरचंद खाणं नुकसानकारक ठरू शकतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
पचनासंबंधी समस्या
सफरचंदमध्ये फायबर भरपूर असतं, जे डायजेशनसाठी चांगलं मानलं जातं. पण पचनासंबंधी समस्या असल्यावर याचं सेवन अजिबात करू नये. या स्थितीत याचं सेवन केलं तर गॅस, पोटदुखी आणि पोटात जळजळ अशा समस्या होऊ शकतात.
डायबिटीस
डायबिटीसच्या रूग्णांनी सुद्धा सफरचंद खाऊ नये असं सांगितलं जातं. कारण यात शुगरचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो.
लठ्ठपणा
काही फळं ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी ओळखले जातात, तर काही वाढवण्यासाठी. सफरचंद अशा फळांमध्ये येतं जे लठ्ठपणा वाढवतात. कारण यात भरपूर प्रमाणात कॅलरी आणि शुगर असते.
एलर्जी
सफरचंद खाल्ल्याने काही लोकांना एलर्जीही होऊ शकते. अशात जर सफरचंद खाल्ल्याने त्वचे खाज, रॅशेज किंवा सूज दिसत असेल तर याचं सेवन करू नये.