Cholesterol Side effects: 'या' पदार्थांमुळे तुमच्या शरीरात वाढतं कॉलेस्ट्रॉल, 'अशी' ओळखा लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 05:39 PM2022-02-27T17:39:32+5:302022-02-27T17:42:31+5:30

कोलेस्ट्रॉलचे सामान्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) जे शरीरासाठी अपायकारक असतं आणि दुसरं म्हणजे गुड किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) जे शरीरासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्सप्रमाणे आवश्यक असतं.

side effects of bad cholesterol | Cholesterol Side effects: 'या' पदार्थांमुळे तुमच्या शरीरात वाढतं कॉलेस्ट्रॉल, 'अशी' ओळखा लक्षणं

Cholesterol Side effects: 'या' पदार्थांमुळे तुमच्या शरीरात वाढतं कॉलेस्ट्रॉल, 'अशी' ओळखा लक्षणं

googlenewsNext

आपण आहारात तेलकट पदार्थांचा अधिक समावेश केला तर त्याच्यामुळं शरीरात अपायकारक कोलेस्ट्रॉल वाढतं. यामुळं हृदयविकाराचा झटका आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. या समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढत आहे, हे वेळीच जाणून घेणं.

कोलेस्ट्रॉल म्हणजे पेशींबाहेरील एका विशेष घटकापासून बनलेला थर असतो. वैद्यकशास्त्रात याला लिपीड (Lipid) असं म्हणतात. कोलेस्ट्रॉलचे सामान्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) जे शरीरासाठी अपायकारक असतं आणि दुसरं म्हणजे गुड किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) जे शरीरासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्सप्रमाणे आवश्यक असतं.

उच्च कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी आहे धोकादायक
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, जेव्हा कोलेस्टेरॉल वाढतं, तेव्हा हृदयाजवळ असलेल्या धमन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते आणि रक्त प्रवाहात समस्या निर्माण होतात. यामुळं हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. सकस पदार्थ खाण्याव्यतिरिक्त आपण दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे. अन्यथा, कॅलरीज बर्न न झाल्यामुळं शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते.

कोलेस्ट्रॉल वाढलंय की नाही हे कसं ओळखावं?

  • कोलेस्टेरॉल वाढल्याचं लिपिड प्रोफाइल ब्लड टेस्टद्वारे (Lipid Profile Blood Test) ओळखलं जातं.
  • अँजिओग्राफीमुळं (Angiography) हृदयाच्या धमन्या किती ब्लॉक झाल्या आहेत किंवा अरुंद झाल्या आहेत, हे कळतं.
  • मेंदूमध्ये ब्लॉकेज असेल तर मेंदूतील रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी करावी लागेल.


हा त्रास कसा टाळायचा?
शरीरातील चरबीची वाढ थांबवायची असेल तर, हेल्दी कोलेस्ट्रॉल (Healthy cholesterol) म्हणजेच शरीरासाठी चांगलं असलेलं कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाणं सुरू करा. त्याला वैद्यकीय भाषेत उच्च घनता लिपोप्रोटीन (High-density lipoprotein) किंवा एचडीएल (HDL) म्हणतात. याच्या सेवनानं हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि ब्रेन स्ट्रोकचा (Brain Stroke) धोका कमी होतो.

या पदार्थांमध्ये असतं खराब कोलेस्ट्रॉल

  • लोणी
  • फास्ट फूड
  • जंक फूड
  • चीज
  • साखर

Web Title: side effects of bad cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.