काळे मीरे जास्त प्रमाणात खाल्ल्याने होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 09:39 AM2022-11-18T09:39:18+5:302022-11-18T09:40:45+5:30
Side Effects Of Black Pepper: याचा काढा प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. तसेच सर्दी, खोकलासारख्या समस्या दूर होतात. पण याचं जास्त सेवन करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ काय काय होतात नुकसान...
Side Effects Of Black Pepper: काळे मीरे एक असा मसाला आहे ज्या वापर जवळपास सगळ्याच भारतीय किचनमध्ये होतो. याने पदार्थांची चव तर वाढतेच सोबतच आरोग्याला अनेक फायदेही होतात. अनेक लोक याचा आयुर्वेदिक औषधी म्हणूनही वापर करतात. याचा काढा प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. तसेच सर्दी, खोकलासारख्या समस्या दूर होतात. पण याचं जास्त सेवन करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ काय काय होतात नुकसान...
1) श्वास घेण्यास समस्या
जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त काळे मीऱ्याचं सेवन कराल तर तुम्हाला श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. कारण हे रेस्पिरेट्री प्रॉब्लम्ससाठी जबाबदार आहे. याने ऑक्सीजनच्या फ्लोवर प्रभाव पडतो. त्यामुळे व्यक्ती व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाही.
2) स्कीन डिजीज
प्रत्येकाला वाटत असतं की, त्यांची त्वचा सुंदर आणि चमकदार दिसावी. यासाठी गरजेचं आहे की, त्वचेत ओलावा रहावा. काळे मीरे उष्ण असतात. त्यामुळे याने ओलावा शोषला जातो. या कारणाने त्वचेवर खाज, जळजळ आणि दाणे येतात.
3) पोटात अल्सर
जे लोक जास्त प्रमाणात काळ्या मीऱ्याचं सेवन करतात त्यांनी पोटासंबंधी समस्या होऊ शकते. यात पोटाचा अल्सरही होऊ शकतो. याच कारणाने तुम्ही याचं कमी प्रमाणात सेवन करावं. हवं तर याच्या सेवनासाठी तुम्ही डायटिशिअनचा सल्लाही घेऊ शकता.
4) प्रेग्नेंसीमध्ये नुकसान
प्रेग्नेंट महिलांनी उष्ण असलेले पदार्थ खाऊ नये. काळे मीरे जास्त प्रमाणात खाल्ल्याने लॅक्टेशनची समस्या होऊ शकते. ज्यामुळे दूध पिणाऱ्या बाळांना नंतर समस्येचा सामना करावा लागू शकतो.