तांब्याच्या भांड्यातील पाण्याने केवळ फायदाच नाही तर नुकसानही होतं, जाणून योग्य पद्धत...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 04:31 PM2022-12-06T16:31:38+5:302022-12-06T16:31:52+5:30
Copper Vessel Water: जसे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे आहेत, तसे याचे काही लोकांना नुकसानही होतात. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना खूप काळजी घ्यावी लागते.
Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यातील पाणी पायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात हे तर सगळ्यांनाच चांगलं माहीत आहे. तांब्यात पाणी शुद्ध करण्याची शक्ती असते. तसेच तांब्यातील अनेक तत्व पाण्यात उतरल्याने त्या पाण्याने शरीराला फायदे मिळतात. अनेक लोक प्युरिफायरऐवजी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याला पसंती देतात. या पाण्यात वात आणि पित्त बॅलन्स करण्याचे गुण असतात. जसे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे आहेत, तसे याचे काही लोकांना नुकसानही होतात. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना खूप काळजी घ्यावी लागते.
जमिनीवर ठेवू नका
अनेक लोक झोपण्याआधी जमिनीवर तांब्याचं भांड ठेवतात आणि सकाळी उठून त्यातील पाणी पितात. पण असं काही नुकसानकारक ठरू शकतं. तांब्याचं भांड जमिनीवर ठेवू नये. ते एखाद्या लाकडी टेबलवर ठेवावं. नाही तर हे या पाण्याने तुम्हाला नुकसान होऊ शकतं.
अॅसिडिटीमध्ये नुकसानकारक
तांब्याचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहेच. पण अॅसिडिटी असलेल्या लोकांसाठी हे पाणी नुकसानकारक ठरू शकतं. कारण हे पाणी उष्ण असतं. ज्यामुळे अॅसिडिटी असलेल्यांना याने नुकसान होऊ शकतं.
सकाळी रिकाम्या पोटी प्यावं
तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. जेवण केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने नुकसान होऊ शकतं. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनासंबंधी फायदा होतो. जर जेवण करून हे पाणी प्याल तर पचनाला समस्या होऊ शकते.
किती वेळ ठेवावं?
हे पाणी पिऊन फायदे मिळवायचे असतील तर पाणी तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवावं. 48 तास तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवू शकता. जास्त वेळ भांड्यात पाणी ठेवूनही ते शुद्धच राहतं.