चहानंतर चुकूनही करू नका पाणी पिण्याची चूक, होऊ शकतात या गंभीर समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 04:01 PM2022-11-22T16:01:20+5:302022-11-22T16:01:50+5:30
Drinking Water After Tea: चहावर पाणी प्यायल्याने आरोग्याचं नुकसान होतं. हे काही असंच सांगितलं जात नाही. यामागे सायंटिफिक रिजन आहे. चला जाणून घेऊ चहा प्यायल्यावर पाणी न पिण्याचा सल्ला का दिला जातो.
Drinking Water After Tea: अनेकदा तुम्ही घरातील वृद्ध लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की, चहा प्यायल्यानंतर पाणी पिऊ नये. याला एखादी जुनी मान्यता म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं खरंच नुकसानकारक आहे. चहावर पाणी प्यायल्याने आरोग्याचं नुकसान होतं. हे काही असंच सांगितलं जात नाही. यामागे सायंटिफिक रिजन आहे. चला जाणून घेऊ चहा प्यायल्यावर पाणी न पिण्याचा सल्ला का दिला जातो.
दातांचं नुकसान
चहावर पाणी प्यायल्याने दातांचं नुकसान होतं. चहावर पाणी पिण्याचा थेट प्रभाव आपल्या दातांवर पडतो. दातांचा वरचा थर म्हणजे इनॅमल गरमनंतर थंड लागल्यावर प्रभावित होतो. इनॅमल दातांवर कवचासारखं काम करतं. गरम नंतर थंड काही खाल्ल्याने इनॅमल डॅमेज होऊ शकतं. चहानंतर पाणी प्यायल्याने हिरड्याही कमजोर होतात. यामुळे सेंसिटिविटीची समस्या होऊ शकते.
अल्सरचं कारण
चहानंतर पाणी पिणं पचनक्रियेसाठी नुकसानकारक ठरतं. चहावर पाणी प्यायल्याने अल्सरचा धोकाही वाढतो. चहानंतर थंड पाणी प्यायल्याने अनेक लोकांना अॅसिडीटीची समस्या होऊ शकते. ही समस्या नेहमीच होत राहते ज्यामुळे अल्सरसारखी गंभीर समस्येचा धोका वाढतो.
सर्दी-खोकल्याची समस्या
वातावरण बदललं की, सर्दी-खोकल्याची समस्या होतेच होते. ही समस्या शरीराच्या तापमान बदलामुळे होते. चहानंतर पाणी प्यायल्यानेही एकाएकी तापमानात बदल होतो. यामुळे सर्दी-खोकला आणि घशात खवखव होण्याची समस्या होऊ शकते.
नाकातून रक्त येणे
उन्हाळ्यात अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या होत असते. हे गरमीमुळे नाही तर थंड आणि गरम तापमान एकदम बदलल्यामुळे होतं. जर चहावर थंड पाणी प्याल तर नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ शकते.