उन्हाळ्यात पुन्हा पुन्हा लिंबू पाणी पिता का? फायद्यांऐवजी होऊ शकतात गंभीर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:19 AM2024-05-22T11:19:46+5:302024-05-22T11:20:37+5:30

Lemon Water Side Effects :खासकरून उन्हाळ्यात लोक शरीर थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर लिंबू पाणी पितात. पण अनेकांना माहीत नसतं की, याचं सेवन जास्त केलं तर शरीराला वेगवेगळ्या समस्या होतात.

Side effects of drinking too much lemon water | उन्हाळ्यात पुन्हा पुन्हा लिंबू पाणी पिता का? फायद्यांऐवजी होऊ शकतात गंभीर नुकसान

उन्हाळ्यात पुन्हा पुन्हा लिंबू पाणी पिता का? फायद्यांऐवजी होऊ शकतात गंभीर नुकसान

Lemon Water Side Effects : लिंबाच्या रसाचे किंवा लिंबू पाण्याचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणूनच लोक कोणत्याही ऋतुमध्ये लिंबू पाण्याचं भरपूर सेवन करतात. खासकरून उन्हाळ्यात लोक शरीर थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर लिंबू पाणी पितात. पण अनेकांना माहीत नसतं की, याचं सेवन जास्त केलं तर शरीराला वेगवेगळ्या समस्या होतात.

उन्हाळ्यात लोक लिंबू पाण्यासोबतच लिंबाचं सेवन चटणी, भाजी, सलादच्या माध्यमातूनही करतात. ज्यामुळे काही गंभीर नुकसान होऊ शकतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण अधिक असतं. जर वेगवेगळ्या फळांच्या माध्यमातून शरीरात व्हिटॅमिन सी चं प्रमाण वाढतं. ज्यामुळे समस्याही वाढतात.

लिंबाचं जास्त सेवन केल्याने दातांपासून ते एकूणच आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान होऊ शकतात. वयस्कांनी दिवसभरात केवळ 1 ते 2 वेळा लिंबाचं पाणी पिणं योग्य आहे. पण त्यापेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला लिंबाच्या जास्त सेवनाचे नुकसान सांगणार आहोत.

दातांची समस्या

नॅशनल इन्स्टिट्यू ऑफ हेल्थनुसार, लिंबाचा रस आम्लीय असतो आणि हे अॅसिड दातांना नुकसान पोहोचवू शकतं. लिंबाचा जर वेगवेगळ्या माध्यमातून रोज जास्त सेवन करत असाल तर दात संवेदनशील होऊ शकतात आणि कॅविटीची समस्या वाढू शकते. दातांचं जास्त नुकसान होऊ  नये म्हणून लिंबू पाणी पिताना तुम्ही स्ट्रॉ चा वापर करू शकता. जेणेकरून आम्लीय पदार्थ थेट दातांच्या संपर्कात येऊ नये.

गॅस्ट्रिक समस्या

लिंबामध्ये सिट्रिक अॅसिड भरपूर असतं. ज्याने पोटात अॅसिडचं प्रमाण वाढतं. असं झालं तर पोटात जळजळ आणि गॅसची समस्या होऊ शकते. याचं जास्त सेवन केलं तर अॅसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी वाढू शकतं. ज्यामुळे पोटातील अॅसिड घशातील नळीमध्ये येतं. ज्याने हार्टबर्नची समस्या होऊ शकते.

व्हिटॅमिन सी वाढतं

व्हिटॅमिन सी चं प्रमाण वाढणं पोटासाठी चांगलं नाही. यामुळे जुलाब आणि पोटात गाठ येणे यांसारखया समस्या होऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन सी वाढल्याने जुलाब होऊ शकतात. इतकंच नाही तर आतड्यांवर जखम होण्याचा धोकाही असतो.

घशात समस्या

लिंबाचं अधिक सेवन केल्याने घशात समस्या होऊ शकते. लिंबाचा रस घशात जळजळ आणि खवखव निर्माण करतो. लिंबामधील सिट्रिक घशातील पडद्यांना इजा करू शकतं. ज्यामुळे घशात खवखव आणि सूजही येऊ शकते.

पेप्टिक अल्सर गंभीर होऊ शकतो

लिंबामध्ये असलेल्या सिट्रिक अॅसिड आणि आम्लतेमुळे पेप्टिक अल्सरसारखी पोटाची समस्या वाढू शकते. त्यामुळे आधीच लिंबाच अधिक सेवन करणं टाळलं पाहिजे.

Web Title: Side effects of drinking too much lemon water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.