पाणी जीव वाचवू शकतं, तसं जिवावर बेतूही शकतं, जास्त पाणी प्यायल्याने होतं 'असं' नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 11:30 AM2024-08-10T11:30:51+5:302024-08-10T11:31:36+5:30
Drinking too much water Side Effects : पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं.
Drinking too much water Side Effects : पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. पाण्याने केवळ तहान भागते असं नाही तर पाण्यातून शरीराला अनेक महत्वाचे मिनरल्स मिळतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं.
जास्त पाणी पिण्याचे नुकसान
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं घातकही ठरू शकतं. जास्त पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. शरीरात जास्त पाणी जमा झाल्याने वॉटर टॉक्सिसिटी होऊ शकते.
ही समस्या तेव्हा होते जेव्हा शरीरात प्रमाणापेक्षा जास्त पाणी जमा होतं. जे किडनी बाहेरद्वारे बाहेर काढलं जातं. अशात शरीरात जास्त पाणी झाल्यावर काय समस्या होतात याबाबत एक्सपर्टने काही गोष्टी सांगितल्या आहेत.
काय सांगतात एक्सपर्ट?
एक्सपर्ट सांगतात की, फार जास्त पाणी पिण्याला हायपोनेट्रेमिया किंवा वॉटर इन्टॉक्सिफिकेशन असं म्हटलं जातं. जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट असंतुलित करतात. फार जास्त पाण्याने रक्तात सोडिअमचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे सेल्समध्ये सूज येते. गंभीर स्थितींमध्ये यामुळे झटकेही येऊ शकतात. व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते.
त्याशिवाय जास्त पाणी प्यायल्याने डोकेदुखी, मळमळ, उलटी आणि भ्रम होण्यासारख्या समस्या होतात. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचं काम करतात, पण जेव्हा शरीरात पाणी जास्त वाढतं तेव्हा किडनीवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे किडनी हे पाणी पूर्णपणे बाहेर काढू शकत नाही.
काय काळजी घ्याल?
शरीर हायड्रेटेड राहणं फार महत्वाचं आहे. तेवढंच गरजेचं आहे की, पाणी योग्य प्रमाणात प्यावं आणि शरीराच्या गरजांवर लक्ष द्यावं. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण शरीराची पाण्याची गरज ही प्रत्येक व्यक्तीनुसार, वजनानुसार, वयानुसार वेगळी असते. अशात जास्त पाणी पिणं टाळलं पाहिजे.
किती पाणी प्यावे?
वेगवेगळ्या कारणांनी पाणी पिण्याच्या खास वेळा असतात. पण याचा अर्थ असा नाही की, फक्त याच वेळेवर पाणी प्यावं. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. ती शरीराची गरज आहे. ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.