Water After Food: तुम्हीही जेवण झाल्यावर लगेच पाणी पिता का? जाणून घ्या याचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:03 PM2022-04-12T12:03:21+5:302022-04-12T12:03:44+5:30
Water After Food : हेल्थ एक्सपर्टनुसार, अन्न पचनाला साधारण २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्यास त्याचा प्रभाव डायजेशनवर पडतो.
Water After Food: पाणी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी फार महत्वाचं असतं. दररोज याच कारणामुळे हेल्थ एक्सपर्ट ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. डॉक्टरांनुसार, जेवण करताना पाणी पिणं टाळलं पाहिजे. जेवण करताना किंवा जेवल्यावर लगेच पाणी प्यायल्याने अॅसिडिटी, ब्लोटिंगसारखी समस्या होऊ शकते. जे लोक जेवण केल्यावर लगेच पाणी पितात त्यांना आरोग्यासंबंध अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जेवण झाल्यावर किती वेळाने प्यावे पाणी
हेल्थ एक्सपर्टनुसार, अन्न पचनाला साधारण २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्यास त्याचा प्रभाव डायजेशनवर पडतो. त्यामुळे जेवण झाल्यावर साधारण ४० ते ६० मिनिटांनंतर पाणी प्यावे. हेही महत्वाचं आहे की, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे.
योग्यवेळी पाणी पिण्याचे फायदे
- जेवण केल्यावर एक तासांनंतर पाणी प्यायल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं.
- योग्यवेळी पाणी प्यायल्यास पचनक्रिया चांगली राहते.
- पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होत नाही.
- शरीरात अन्नातील पोषक तत्व चांगल्याप्रकारे शोषूण घेतं.
- याने झोपली चांगली लागते.
जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे नुकसान
- लठ्ठपणा वाढण्याची समस्या
- पचनक्रिया योग्य होत नाही
- ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची समस्या
- पोटात गॅस होण्याची समस्या