प्रमाणापेक्षा जास्त पेरू खाणं धोकादायक, कोणत्या लोकांना होऊ शकते समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 04:52 PM2023-04-13T16:52:46+5:302023-04-13T16:54:54+5:30

These People Should Not Eat Guava: भारतातील न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी सांगितलं की, यात इतके पोषक तत्व असूनही सगळ्यांसाठीच हे फळ फायदेशीर नाही. काही कंडीशनमध्ये पेरू जास्त खाणं टाळलं पाहिजे.

Side effects of eating excess guava fruit who should not eat | प्रमाणापेक्षा जास्त पेरू खाणं धोकादायक, कोणत्या लोकांना होऊ शकते समस्या?

प्रमाणापेक्षा जास्त पेरू खाणं धोकादायक, कोणत्या लोकांना होऊ शकते समस्या?

googlenewsNext

These People Should Not Eat Guava: पेरू हे एक सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडणारं आंबड-गोड असं फळ आहे. याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पेरूमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अॅंटीऑक्सिडेंट आढळतात. जे शरीरासाठी फार फायदेशीर आहेत. त्याशिवाय या फळामध्ये फोलेट आणि बीटा कॅरोटीनही अससतं. पण भारतातील न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी सांगितलं की, यात इतके पोषक तत्व असूनही सगळ्यांसाठीच हे फळ फायदेशीर नाही. काही कंडीशनमध्ये पेरू जास्त खाणं टाळलं पाहिजे.

सर्दी-खोकला असल्यास

ज्या लोकांना सर्दी-खोकल्याची समस्या आहे त्यांनी पेरू खाऊ नये. कारण पेरू थंड असतो आणि याने समस्या आणखी वाढू शकते. खासकरून रात्रीच्या वेळी पेरू खाणं टाळलं पाहिजे. असं केलं तर समस्या आणखी वाढू शकते.

इरिटेटेड बाउल सिंड्रोम

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे डायजेशनसाठी मदत करतं आणि बद्धकोष्ठताही याने दूर होते. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, याच्या जास्त सेवनाने पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. खासकरून जे लोक इरिटेटेड बाउल सिंड्रोमचे शिकार आहेत त्यांनी कमीत कमी पेरू खावा.

सूज असलेले लोक

पेरूममध्ये फ्रुक्टोज आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं या दोन्हीच्या जास्त सेवनामुळे पोट फुगलेलं जाणवू शकतं. यामुळे शरीराला जास्त व्हिटॅमिन सी एब्जॉर्ब करण्यासाठी समस्या होते. त्यामुळे जास्त पेरू खाल तर याने सूज येते. यातील नॅच्युरल शुगर ब्लोटिंगची समस्या वाढवू शकते. 

डायबिटीस

पेरू एक लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं फळ आहे ज्यामुळे डॉक्टर डायबिटीसच्या रूग्णांना हे फळं खाण्याचा सल्ला देतात. पण हे तेव्हाच फायदेशीर ठरतं जेव्हा ते कमी प्रमाणात खालं. सोबतच तुमची ग्लूकोजही चेक करत रहा आणि यात नॅच्युरल शुगर असते.

एका दिवसात किती पेरू खावे

एका दिवसात तुम्ही दोन मीडियम आकाराचे पेरू खाऊ शकता. याने तुम्हाला फायदा मिेळेल. दोन जेवणाच्या मधे खाल तर अधिक फायदा होईल. तसेच एक्सरसाइजच्या आधीही याचं सेवन करणं चांगलं मानलं जातं. 

Web Title: Side effects of eating excess guava fruit who should not eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.