बहुगुणकारी आवळा 'या' लोकांसाठी आहे विषासमान! चुकूनही खाल्यास पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 04:00 PM2023-12-23T16:00:22+5:302023-12-23T16:02:24+5:30
काही लोकांसाठी आवळा खाणं महागात पडू शकतं.
Amla Side Effects : हिवाळ्यात हंगामी फळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. बोरे, आवळा यांसारखी हंगामी फळे खरेदी करण्याचा लोकांचा मोठा कल असतो. विशेष बाब म्हणजे या फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोक या फळांचा मनमुराद आनंद घेतात.
आवळा आरोग्यासाठी गुणकारी असल्याचे सांगण्यात येते. वेगवेगळ्या पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. आवळा हा आम्लयुक्त असून त्यात सोडियम, पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने काही लोकांच्या आरोग्यासाठी आवळा खाणे घातक ठरू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणते आजार असलेल्या लोकांनी आवळा खाणे टाळायला हवे हे जाणून घेऊयात.
अॅसिडीटीचा त्रास :
अॅसिडीटीचा त्रास असल्यास आवळा खाणे टाळले पाहिजे. कारण आवळ्यामध्ये व्हिटामीन सी चे प्रमाण जास्त असल्याने त्याचे रुपांतर आम्लात होते. त्या कारणाने ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो आणि त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.
सर्दी खोकला असल्यास सेवन टाळावे :
आवळा हे मुख्यत: थंड फळ मानले जाते. त्यामुळे सर्दी,खोकला किंवा ताप असलेल्या लोकांनी आवळा खाणे टाळले पाहिजे.
सर्जरी आधी :
एखाद्या रूग्णावर कोणत्याही प्रकारची सर्जरी होणार असेल तर त्याने ऑपरेशनच्या दोन आठवड्याआधी आवळ्याचं सेवन बंद करणे गरजेचे आहे. असे केले नाही तर तुमच्या धमण्या फुटू शकतात आणि ब्लीडिंगचा धोका वाढतो.