फ्रिजमध्ये पीठ ठेऊन शिळ्या चपात्या खाताय? सवय पडेल महागात; होऊ शकतात 'हे' आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 01:58 PM2022-02-14T13:58:22+5:302022-02-14T17:41:29+5:30

तज्ज्ञांच्या मते, शिळ्या मळलेल्या पिठाच्या चपात्या खाणं आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

side effects of eating rotis from dough which is refrigerated, you will face stomach problem | फ्रिजमध्ये पीठ ठेऊन शिळ्या चपात्या खाताय? सवय पडेल महागात; होऊ शकतात 'हे' आजार

फ्रिजमध्ये पीठ ठेऊन शिळ्या चपात्या खाताय? सवय पडेल महागात; होऊ शकतात 'हे' आजार

Next

आपल्याकडे अनेकदा असे घडते की, चपातीसाठी मळलेले पीठ शिल्लक राहते. मग साहजिकच ते पुन्हा वापरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले (refrigerated atta) जाते आणि नंतर त्याचा चपात्या चपात्या बनवण्यासाठी वापर केला जातो. मात्र, तज्ज्ञांच्या मते, शिळ्या मळलेल्या पिठाच्या चपात्या खाणं आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. याबाबत झी न्यूजने बातमी दिली आहे.

आजारी पडाल
पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवल्यास (refrigerated atta) फ्रीजमधील हानिकारक वायू त्यात प्रवेश करतात. अशा परिस्थितीत या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता.

पोटाच्या समस्या
पीठ मळून घेतल्यानंतर त्यात आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे पिठात बॅक्टेरिया वाढू शकतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या मळलेल्या पीठापासून चपात्या बनवल्यास पोट खराब होऊ शकते. शिळ्या पिठाच्या रोट्या खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत
शिळ्या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ शकते.

पीठ मळून झाल्यावर लवकरात लवकर वापरणे गरजेचे आहे. कारण तासाभरानंतर त्यात रासायनिक बदल होऊ लागतात. या पिठाच्या रोट्या किंवा पराठे खाल्ल्यास आरोग्याला मोठी हानी होते.

Web Title: side effects of eating rotis from dough which is refrigerated, you will face stomach problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.