नुसतेच सॅलड खाणार त्याचे पोट बिघडणार... आहारतज्ज्ञ काय सांगतात; वाचा या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:09 PM2024-07-18T16:09:03+5:302024-07-18T16:17:03+5:30
आजकाल वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात.
Health Tips : आजकाल वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात. त्यामध्ये कुणी दिवसातून एकदा जेवतं तर काहींना बारा तासांच्या अंतराने खाण्याची सवय असते. तर काहीजण वेगळ्या पद्धतीच्या आहाराचा डाएटमध्ये समावेश करतात. त्यापैकी बरेच लोक फक्त सॅलड खाऊन त्यांची रोजची दिनश्चर्या करत असतात. मात्र, अशा पद्धतीने सॅलड खाल्ल्याने नागरिकांच्या शरीरावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे. यामध्ये विशेष करून चयापचय कार्यावर परिणाम होऊन पोट बिघडण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांचं म्हणणं काय?
आपले शरीर चांगले आणि ऊर्जामय ठेवायचे असेल तर आपल्याला संतुलित आहाराची गरज आहे. त्यामध्ये सर्व पोषक तत्वे शरीराला मिळतील या गोष्टी समाविष्ट असणे गरजेचे आहे. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे वजन कमी व्हावं यासाठी केवळ सॅलड खात असाल तर त्याचा शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर विपरीत परिमाण होतो. त्यामुळे जर तुम्हाला दिवसभराच्या आहाराचे नियोजन करायचे असेल तर शास्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. यासाठी वैद्यकीय सल्ला किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अतिसॅलड खाण्याचे दुष्परिणाम-
१) फक्त कच्चा पालेभाज्या आणि फळे खाल्ल्यामुळे त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन गॅस आणि पोट फुगण्याचे प्रकार होतात.
२) काही वेळा तर काही जणांना जुलाबाचा त्रासही होतो. त्यामुळे डाएटमध्ये त्याचं प्रमाण किती असावं यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
दररोज सॅलड किती खायला हवं?
१) आपल्या शरीराला रोजचं कार्य करतााना संतुलित आहार घेणं गरजचं आहे. त्यामुळे आपल्या शरीराला ३० ग्रॅम फायबरची गरज असते. ती सलॅडमधून पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच मायक्रोन्यूट्रीयन्ट्स गरज असते.
२) मायक्रोन्यूट्रीएन्ट्समध्ये मोड आलेली कडधान्ये, तेलबिया आणि सालीसकट डाळ याचा समावेश असावा. यामधून शरीराला प्रथिने, कर्बोदके मिळतील. त्यामुळे या सर्व गोष्टींचा वापर सॅलडमध्ये करावा. नुसतं सॅलड खाऊ नये.