प्रमाणापेक्षा जास्त पिझ्झा खाणं पडू शकतं महागात, होतात अनेक गंभीर समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 10:01 AM2023-12-05T10:01:21+5:302023-12-05T10:01:48+5:30
Side Effects of Eating Pizaa : पिझ्झा एक इटालियन फूड आहे, पण जगभरात त्याला आवडीने खाल्लं जातं. पण याचं जास्त सेवन करणंही महागात पडू शकतं.
Side Effects of Eating Pizaa : आजकाल पिझ्झा खाण्याची क्रेझ खूपच वाढली आहे. आजच्या सगळ्यात फेमस फूड्सपैकी एक म्हणजे पिझ्झा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. पिझ्झा एक इटालियन फूड आहे, पण जगभरात त्याला आवडीने खाल्लं जातं. पण याचं जास्त सेवन करणंही महागात पडू शकतं. याच्या सेवनाने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात. त्या काय हे जाणून घेऊ...
पिझ्झा खाण्याचे नुकसान
1) लठ्ठपणा
पिझ्झामध्ये अनेकदा हाय कॅलरी, सॅच्युरेटेड आणि रिफाइंड कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं. जर तुम्ही हे एका लिमिटपेक्षा जास्त खाल तर पोट आणि कंबरेची चरबी वाढणं फिक्स आहे. जर तुम्ही कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी करत नसाल तर तुम्हाला लठ्ठपणाचा सामना करावा लागेल.
2) हाय बीपी
पिझ्झामध्ये प्रोसेस्ड मीट, पेपरोनी, सॉसेज आणि एक्ट्रा चीज सारखे अनेक असे इंग्रीडिएंट्स असतात ज्यात मीठ जास्त असतं. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, मिठात सोडिअम जास्त असतं. जर याचं सेवन जास्त केलं तर हाय ब्लड प्रेशरची समस्या होते.
3) डायबिटीस
पिझ्झाच्या पिठात रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यात ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढण्याचा धोका होऊ शकतो. ज्यामुळे पुढे जाऊन डायबिटीसही होऊ शकतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी तर पिझ्झा विषासारखा आहे.
4) इनडायजेशन
पिझ्झाची टेस्ट बऱ्याच लोकांना आवडते. ज्यामुळे लोक याचं सेवन जास्त करू लागतात. तसेच यात फॅट जास्त असतं ज्याकारणाने डायजेशनमध्ये समस्या होतात. याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगची समस्या होते.