शरीरात व्हिटॅमिन सी जास्त झाल्यावर होतात 'या' समस्या, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:30 PM2024-08-27T15:30:02+5:302024-08-27T15:31:25+5:30
High Vitamin C Side Effects : जर शरीरात एखादं व्हिटॅमिन जास्त झालं तरी नुकसान होतं. अशात शरीरात व्हिटॅमिन सी चं प्रमाण जास्त झाल्यास शरीरावर काय प्रभाव पडतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
High Vitamin C Side Effects : शरीरासाठी वेगवेगळे व्हिटॅमिन्स फार महत्वाचे असतात. एक जरी व्हिटॅमिन शरीरात कमी झालं तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला हेही माहीत असेल की, कोणत्याही गोष्टीची अति ही सुद्धा नुकसानकारक असते. हे व्हिटॅमिन्सबाबतही लागू पडतं. जर शरीरात एखादं व्हिटॅमिन जास्त झालं तरी नुकसान होतं. अशात शरीरात व्हिटॅमिन सी चं प्रमाण जास्त झाल्यास शरीरावर काय प्रभाव पडतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गट हेल्थवर वाईट प्रभाव
गट हेल्थ म्हणजे आतड्यांचं आरोग्य. जर व्हिटॅमिन सी चं जास्त सेवन केलं गेलं तर आतड्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जास्त व्हिटॅमिन सी मुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यात पोटात जळजळ, गॅस, जुलाब आणि उलटी या समस्या होऊ शकतात.
किडनी स्टोनचा धोका
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी मुळे किडनी स्टोन होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. जर तुम्हाला तुमच्या किडनीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर व्हिटॅमिन सी चं सेवन जास्त प्रमाणात करू नये. तसेच जास्त व्हिटॅमिन सी मुळे हाय यूरिक अॅसिडची समस्या देखील होऊ शकते.
मायग्रेनचा धोका
काही रिपोर्ट्सनुसार, शरीरात प्रमाणापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी झाल्यास मायग्रेनची समस्या होऊ शकते. सतत डोकं दुखणं किंवा डोक्यात चक्कर येणं हा व्हिटॅमिन सी जास्त झाल्याचा इशारा आहे. रोज सामान्यपणे ६० ते ९० मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणातच व्हिटॅमिन सी असलेल्या फूड्सचं सेवन करावं.