जास्त मेथी खाणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या कोणत्या लोकांनी मेथीची भाजी खाणं टाळावं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 12:26 PM2023-11-23T12:26:27+5:302023-11-23T12:26:53+5:30

Fenugreek Leaves Side Effects : मेथी जास्त प्रमाणात खाणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ जास्त मेथी खाण्याचे फायदे...

Side Effects of Fenugreek : Who should not eat Methi | जास्त मेथी खाणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या कोणत्या लोकांनी मेथीची भाजी खाणं टाळावं!

जास्त मेथी खाणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या कोणत्या लोकांनी मेथीची भाजी खाणं टाळावं!

Fenugreek Leaves Side Effects :  हिवाळ्यात मेथीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. मेथीचे पराठे असो वा मेथीची भजी खाऊन मजा येते. मेथीची पाने आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि यात अनेक पोषक तत्व, खनिज आणि व्हिटॅमिन असतात. पण काही लोकांसाठी मेथीची भाजी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. त्याशिवाय ज्याप्रकारे प्रत्येक गोष्टीची अति केल्याने नुकसान होतं तेच मेथीबाबतही आहे. मेथी जास्त प्रमाणात खाणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ जास्त मेथी खाण्याचे फायदे...

पोटात गडबड

मेथीची पाने पोट बिघडवू शकतात. याच्या जास्त सेवनाने अनेकदा जुलाब होण्याचा धोका असतो. खासकरून लहान मुलं आणि गर्भवती महिलांचं पोट मेथी खाऊन लवकर पोट खराब होतं. अशात जर तुमचं पोट आधीच खराब असेल किंवा दुखत असेल तर मेथी खाणं टाळावं.

डायबिटीसमध्ये नुकसान

ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी मेथीची भाजी खाणं घातक ठरू शकतं. डायबिटीसमध्ये रूग्णाला वेगवेगळी औषधं खावी लागतात. मेथी औषधांसोबत रिअॅक्ट करू शकते आणि शरीराचं ब्लड शुगर लेव्हल एकाएकी कमी होऊ शकते. 

ब्लड प्रेशर

डायबिटीस प्रमाणेच ब्लड प्रेशरच्या औषधांसोबतही मेथीची भाजी रिअॅक्ट होऊ शकते. याचं एक कारण हेही आहे की, मेथीच्या पानांमध्ये सोडिअमचं प्रमाण अधिक असतं. ब्लड प्रेशरमध्ये मेथीची भाजी खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं ज्यामुळे बीपीची समस्या होऊ शकते. त्यामुळे ब्लड प्रेशरच्या रूग्णांना मेथीची भाजी न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Side Effects of Fenugreek : Who should not eat Methi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.