'फ्रोजन मटर'चा भरपूर वापर करणं पडू शकतं महागात, होऊ शकतात या ५ गंभीर समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:02 PM2024-07-17T12:02:00+5:302024-07-17T12:03:16+5:30
Frozen peas : काही लोक केवळ फ्रोजन मटरचाच जास्त वापर करतात. पण अनेकांना माहीत नाही की, फ्रोजन मटरने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. त्याच आज जाणून घेणार आहोत.
Frozen Peas Side Effects: मटरपासून तयार वेगवेगळे पदार्थ नेहमीच खाल्ले खातात. पण जेव्हा बाजारात ताजे मटर मिळत नाही तेव्हा बरेच लोक फ्रोजन मटरचा वापर करतात. तर काही लोक केवळ फ्रोजन मटरचाच जास्त वापर करतात. पण अनेकांना माहीत नाही की, फ्रोजन मटरने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. त्याच आज जाणून घेणार आहोत.
वजन वाढतं
तुम्हाला कदाचित अंदाजही नसेल की, फ्रोजन मटरचं जास्त सेवन केल्याने तुमचं वजन वाढू शकतं. कारण या प्रिजर्व फूड्समध्ये स्टार्चचा वापर केलेला असतो. ज्यामुळे फॅट वाढतं. अशात आधीच लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांनी याचं सेवन अजिबात करू नये.
हृदयासाठी घातक
फ्रोजन मटरचा जास्त वापर केल्याने हृदयाचं मोठं नुकसान होऊ शकतं. याने हृदयाच्या धमण्या बंद होऊन शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. तसेच यातील ट्रान्स फॅट नसांचं नुकसान करतं. अशात चुकूनही याचं सेवन करू नये.
डायबिटीस असलेल्यांना धोका
फ्रोजन मटरमध्ये असलेल्या स्टार्चमुळे डायबिटीस असलेल्या रूग्णांची ब्लड शुगर लगेच वाढू शकते. अशात डायबिटीसच्या रूग्णांनी याचं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण याने तुम्हाला शुगर वाढण्याची समस्या होऊ शकते.
पोषक तत्व कमी
फ्रोजन मटरचा जास्त वापर केल्याने पोषक तत्व कमी होण्याची समस्याही होऊ शकते. जास्त काळ मटर फ्रोजन ठेवल्याने यातील पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे नेहमी ताजे मटरच खावेत.
बीपीची समस्या
फ्रोजन मटर खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. कारण यात सोडिअम जास्त असतं. ज्यामुळे तुमची बीपीची समस्या किंवा हृदयरोगाची समस्या वाढू शकते.