लसणाचे फायदे माहित असतील पण त्याचे दुष्परिणामही वेळीच जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 04:58 PM2022-07-17T16:58:10+5:302022-07-17T17:01:10+5:30

दिवसभरात लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. लसणाचे दुष्परिणाम आज जाणून (Side Effects Of Garlic) घेऊया.

side effects of garlic | लसणाचे फायदे माहित असतील पण त्याचे दुष्परिणामही वेळीच जाणून घ्या

लसणाचे फायदे माहित असतील पण त्याचे दुष्परिणामही वेळीच जाणून घ्या

googlenewsNext

फोडणीमध्ये लसूण नसेल तर काय मजा, कोणत्याही पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यात लसणाची महत्त्वाची भूमिका असते. तिखट चव आणि फ्लेवरमुळे हा प्रत्येक पदार्थाचा आवडता मसाला मानला जातो. सॉस, पिझ्झा आणि पास्ता यामध्ये तो जेवढा आवश्यक आहे, तेवढाच तो शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करतो. लसणात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. तो एक उत्तम रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करतो.

मात्र, संतुलित प्रमाणात लसणाचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जास्त प्रमाणात खाल्ल्याने अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. अनेकांना सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 6 ते 7 कळ्या खायला आवडतात, परंतु दिवसभरात लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. लसणाचे दुष्परिणाम आज जाणून (Side Effects Of Garlic) घेऊया.

रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो -
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, लसूण जास्त खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. लसूण जास्त खाल्ल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. विशेषतः जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर. लसणात अँटीथ्रोम्बोटिक गुणधर्म असतात जे रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात.

पचन समस्या -
लसणात फ्रक्टन्सचे प्रमाण जास्त असते. फ्रक्टेन हा एक प्रकारचा कार्ब आहे, ज्यामुळे काही लोकांमध्ये सूज येणे, गॅस आणि पोटदुखी होऊ शकते. तुम्ही जे खाता ते पूर्णपणे पचत नाही. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी दिवसातून दोन किंवा तीन लसणाच्या कळ्यांपेक्षा जास्त लसूण खाल्ला जाऊ नये.

हार्ट बर्न प्रॉब्लेम -
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने अनेकदा छातीत जळजळ होते. जीईआरडी ही एक सामान्य स्थिती आहे. जेव्हा पोटातील ऍसिड अन्न पाईपमध्ये परत येते आणि छातीत जळजळ आणि उलट्या होतात तेव्हा असे होते.

Web Title: side effects of garlic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.