दुधाचा चहा जास्त वेळ उकडणं आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:06 AM2024-06-24T10:06:55+5:302024-06-24T10:10:06+5:30

Side Effect of Over-boiling of Milk Tea: अनेकांना हे माहीत नसतं की, चहा जास्त वेळ उकडल्याने तुमच्या आरोग्याला घातक होऊ शकतो. चहा जास्त वेळ उकडल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.

Side effects of over boiling milk of tea | दुधाचा चहा जास्त वेळ उकडणं आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या

दुधाचा चहा जास्त वेळ उकडणं आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या

Side Effect of Over-boiling of Milk Tea: चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. अनेकांना चहा पिण्याची सवय लागलेली असते. लोक त्यांच्या आवडीनुसार, ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी आणि मिल्क टी घेणं पसंत करतात. दुधाचा चहा सगळ्यात जास्त सेवन केला जातो.

पण अनेकांना हे माहीत नसतं की, चहा जास्त वेळ उकडल्याने तुमच्या आरोग्याला घातक होऊ शकतो. चहा जास्त वेळ उकडल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. अशात चहा किती वेळ उकडायला हवा आणि जास्त वेळ उकडल्याने काय नुकसान होतं हे जाणून घेऊ.

किती वेळ उकडावा चहा?

एक्सपर्टनुसार, सामान्यपणे टेस्ट चांगली आणि हेल्दी राहण्यासाठी चहा किमान ४ ते ५ मिनिटे उकडायला हवा. 

चहा जास्त वेळ उकडल्याने काय होतं नुकसान

शरीरात आयर्न आणि कॅल्शिअम कमी 

दुधाचा चहा जास्त वेळ उकडल्याने त्यात टॅनिनचं प्रमाण वाढतं. जे पोषक तत्वांचं अवशोषण करण्यात अडथळा निर्माण करतं. तसेच जास्त टॅनिन असलेल्या चहाचं सेवन केल्याने शरीरात आयर्नची कमतरता होते. ज्यामुळे एनीमिया होण्याचा धोका असतो. 

चहा अधिक अ‍ॅसिडिक होतो

दुधाचा चहा जास्त वेळ उकडल्याने त्याच्या पीएच लेव्हलमध्ये बदल होतो. ज्यामुळे चहा जास्त अ‍ॅसिडिक होतो.

कॅन्सरचा धोका

दुधाच्या चहाला अधिक उकडल्याने कॅन्सरचा धोका निर्माण करणारं तत्व एक्रीलामाइड तयार होतं. जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक आहे.

पचनासंबंधी समस्या

जास्त उकडलेला दुधाचा सेवन केल्याने अ‍ॅसिडिटी, पोटात वेदना आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. 

ब्लड प्रेशर वाढतं

आधीच उकडलेला चहा पुन्हा पुन्हा उकडल्याने यात टॅनिनचं प्रमाण वाढतं. जे ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतं.

पोषक तत्व नष्ट होतात

दुधाचा चहा अधिक उकडल्याने दुधातील प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअससारखे पोषक तत्व नष्ट होतात.

Web Title: Side effects of over boiling milk of tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.