Green Almonds: कच्चा बदाम गाणं एकायला चांगलं, पण प्रत्यक्षात कच्चे बदाम खाल तर होतील 'हे' गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 02:20 PM2022-02-15T14:20:38+5:302022-02-15T14:23:43+5:30
कच्चे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यास मूत्रपिंड, यकृत तसेच शरीराच्या अनेक अवयवांना हानी पोहोचते, हे अनेक संशोधन आणि अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
बदाम (Almonds) खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे, कोणाला आता नवीन सांगण्याची गरज नाही. पण, कच्चे बदाम (Raw), म्हणजेच हिरवे बदाम खाल्ल्यास ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतं. कच्चे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यास मूत्रपिंड, यकृत तसेच शरीराच्या अनेक अवयवांना हानी पोहोचते, हे अनेक संशोधन आणि अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
OnlyMyHealth नुसार, कच्च्या बदामात amygdalin नावाचे तत्व आढळतं, त्यामुळे ते चवीला थोडे कडू असते. जर तुम्ही कच्चे बदाम योग्य प्रमाणात खाल्लं तर ते फायदेशीर आहे, परंतु, जास्त प्रमामात खात राहिल्यास ते फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकते. जाणून घेऊया यामुळे कोणते (Raw Almonds Side Effects) त्रास होऊ शकतात.
कच्चे बदाम खाण्याचे दुष्परिणाम
1. यकृताचे नुकसान
कच्चे बदाम खाल्ल्यानं तुमच्या यकृताला गंभीर त्रास होऊ शकतो. हे शरीरात मायकोटॉक्सिनच्या उत्पादनास गती देते ज्यामुळे गंभीर पाचन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोट फुगण्याची आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
2. मायग्रेनमध्ये नुकसान
मायग्रेनचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी कच्चे बदाम खाणं फायदेशीर मानलं जात नाही. कच्च्या बदामामध्ये अनेक प्रकारची संयुगे असतात, ज्यामुळे शरीरात अनेक रासायनिक क्रिया होतात आणि मायग्रेनच्या रुग्णांची समस्या वाढू शकते.
3. मूत्रपिंडासाठी हानिकारक
कच्च्या बदामात ऑक्सलेट असते, जे मुतखड्याच्या समस्येचे कारण ठरू शकते. हे मूत्रपिंड साठी हानिकारक मानले जाते.
4. पोषक घटकांमध्ये बिघाड
कच्चे किंवा हिरवे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यानं शरीरातील पोषक तत्वांचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. कच्च्या किंवा हिरव्या बदामामध्ये टॅनिन आढळतात, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर शरीरातील पोषक तत्वांचे शोषण होण्यात समस्या निर्माण होतात. या सर्व कारणांमुळं जर तुम्हाला अगोदरच काही शारीरिक व्याधी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कच्चे बदाम खावेत.