१ महिना सकाळचा नाश्ता टाळला तर काय होईल? वाचाल तर कधीच टाळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:05 PM2024-08-26T12:05:06+5:302024-08-26T12:05:47+5:30

Breakfast Skipping Side Effects : ही सवय जर जास्त काळ राहिली तर शरीराला अनेक समस्या होऊ शकतात. हळूहळू आपलं शरीर अनेक आजारांचं घर बनत जातं.

Side effects of skip breakfast to the body for a month | १ महिना सकाळचा नाश्ता टाळला तर काय होईल? वाचाल तर कधीच टाळणार नाही!

१ महिना सकाळचा नाश्ता टाळला तर काय होईल? वाचाल तर कधीच टाळणार नाही!

Breakfast Skipping Side Effects : जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात ही चहा आणि नाश्त्याने होत असते. जर दिवसाची सुरूवात चांगली झाली तर दिवसभरातील कामेही चांगली होतात आणि दिवसभर एनर्जी सुद्धा मिळते. पण बरेच लोक सकाळचा नाश्ता टाळतात. ही सवय जर जास्त काळ राहिली तर शरीराला अनेक समस्या होऊ शकतात. हळूहळू आपलं शरीर अनेक आजारांचं घर बनत जातं.

एक्सपर्ट सांगतात की, सकाळचा नाश्ता केल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात आणि सोबतच ग्लूकोजही मिळतं. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल मेंटेन राहते. तसेच जास्त काळ सकाळचा नाश्ता स्कीप केल्याने शरीरात ब्लड शुगर लेव्हल कमी होते. ज्यामुळे टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. अशात आज आम्ही तुम्हाला सकाळचा नाश्ता स्कीप केल्याने काय समस्या होतात हे सांगणार आहोत.

चिडचिडपणा वाढतो

न्यूरोट्रान्समीटर सेराटोनिन आपल्या मूडला प्रभावित करतात, जे आपल्या नाश्त्याने प्रभावित होतात. जर आपण एक महिना लागोपाठ नाश्ता केला नाही तर सेराटोनिनचं प्रमाण बाधित होऊ शकतं. ज्यामुळे चिडचिडपणा, चिंता आणि डिप्रेशनची लक्षण वाढण्याचा धोका असतो.

वजन वाढतं

एक्सपर्ट सांगतात की, सकाळचा नाश्ता बंद केल्याने वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू लागतं. जेव्हा आपण नाश्ता टाळतो तेव्हा दुपारचं जेवण जास्त केलं जातं. जे वजन वाढण्याचं कारण ठरतं.

मेटाबॉलिक सिंड्रोम

नाश्ता न केल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोकाही वाढतो. ज्यामुळे तुम्हाला हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो.

हृदयरोगाचा धोका

एक्सपर्ट सांगतात की, जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा धोका अधिक असतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे नाश्ता करावा.

टाइप २ डायबिटीस

जर तुम्ही नेहमीच सकाळचा नाश्ता टाळला तर तुम्हाला टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. नाश्ता स्कीप केल्याने शरीरात ब्लड शुगर कंट्रोल राहत नाही, ज्यामुळे डायबिटीसचा धोका वाढतो.

Web Title: Side effects of skip breakfast to the body for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.