Health tips: व्हाईट ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकतं धोकादायक, द्याल 'या' गंभीर आजाराला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 01:50 PM2022-03-09T13:50:47+5:302022-03-09T13:59:33+5:30

व्हाईट ब्रेड तुमच्यासाठी धोक्याचं आहे. आता यामुळे तुमच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

side effects of white bread | Health tips: व्हाईट ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकतं धोकादायक, द्याल 'या' गंभीर आजाराला आमंत्रण

Health tips: व्हाईट ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकतं धोकादायक, द्याल 'या' गंभीर आजाराला आमंत्रण

googlenewsNext

वेस्टन्स कल्चर नुसार आपण देखील आपल्या ब्रेकफस्टमध्ये ब्रेडचा समावेश करुन घेतला आहे. ज्यामुळे आपण सकाळचा नाष्टा म्हणून ब्रेड बटर, ब्रेड जाम, ब्रेड ऑम्लेट सारखे पदार्थ आवडीने खातो. तुम्ही देखील त्यांपैकी एक असाल तर तुम्हाला ब्रेडला तुमच्या नाष्ट्यामधून काढून टाकावा लागेल. कारण हे तुमच्या शरीराला हानी पोहोचवतात.

खास करुन व्हाईट ब्रेड हे तुमच्या आरोग्यासाठी फारच नुकसान कारक आहे. त्यामुळे तुमची इच्छा नसली तरी, तुम्हाला आता त्याला खाणं टाळायचं आहे. कारण व्हाईट ब्रेड तुमच्यासाठी धोक्याचं आहे. आता यामुळे तुमच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोग्य तज्ज्ञ व्हाईट ब्रेडला आरोग्यासाठी हानिकारक मानतात. असे मानले जाते की सतत व्हाईट ब्रेड खाण्याची तुमची सवय अनेक समस्या वाढवू शकते.

व्हाईट ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते
असे मानले जाते की हे ब्रेड बनवण्यासाठी मैदा वापरला जातो, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे व्हाईट ब्रेड पौष्टिकतेच्या दृष्टीने उत्तम नाही. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरावर अनेक हानिकारक परिणाम होऊ शकतात.

व्हाईट ब्रेड खाण्याचे तोटे
- व्हाईट ब्रेड खाल्ल्याने वजनही वाढते. म्हणजेच लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी याचे सेवन कधीही करू नये.
- याशिवाय ते खाल्ल्याने साखरेची पातळीही वाढू शकते. साखरेच्या रुग्णांनी ते कधीही खाऊ नये.
- असे मानले जाते की व्हाईट ब्रेड खाल्ल्याने मानसिक स्थितीवर देखील परिणाम होतो.

Read in English

Web Title: side effects of white bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.