तुम्ही नेहमी अशाप्रकारे पाय क्रॉस करुन बसता? मग हे वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 03:14 PM2018-07-03T15:14:45+5:302018-07-03T15:16:08+5:30
एका अभ्यासानुसार, 60 टक्के महिला अशा पोजिशनमध्ये बसतात. चला जाणून घेऊ अशाप्रकारे बसल्याने तुम्हाला काय काय समस्या होऊ शकतात.
बऱ्याचदा लोक बसताना ते कसे किंवा कोणत्या पोजिशनमध्ये बसतात याकडे लक्ष देत नाहीत. पण हे पायांना दुमडवून बसणे धोकादायक आहे. महिलांमध्ये असा एक समज आहे की, पायांवर पाय ठेवून बसणे त्यांची एक स्टाइल आहे. पण अशाप्रकारे पायांना क्रॉस करुन बसल्याने तुम्हाला अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो. त्यासोबतच तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगासोबतच हाडे आणि पाठदुखीही होऊ शकते. अशाप्रकारे पाय करुन बसल्याने पायांच्या नसा दबल्या जातात त्यामुळे पॅरालिसिस होण्याचा धोकाही असतो. एका अभ्यासानुसार, 60 टक्के महिला अशा पोजिशनमध्ये बसतात. चला जाणून घेऊ अशाप्रकारे बसल्याने तुम्हाला काय काय समस्या होऊ शकतात.
1) मांसपेशी होतात सून्न
एकाच पोजिशनमध्ये बसल्याने मांसपेशी सुन्न होतात. क्रॉस पाय करुन बसल्यास तुमच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूस त्रास होऊ लागतो. त्यासोबतच एकाच प्रकारच्या पोजिशनमध्ये बसून काम केल्यानेही अंगदुखी होऊ लागते. हा त्रास होऊ लागल्यास लगेच थोडावेळ शतपावली करा.
2) मान आणि पाठदुखी
नेहमी क्रॉस पाय करुन बसल्यास तुमच्या मानेवर आणि पाठीवर प्रभाव पडतो. असह्य वेदनाही होऊ लागतात. पाठीच्या कण्यावर शरीर टिकून असतं त्याच्यावर दबाव पडल्यास मान आणि पाठदुखी होते.
3) व्हेरिकॉज व्हेन्स
वाढ झालेल्या नसांना व्हेरिकॉज नसा म्हणतात. कोणत्याही नसा या व्हेरिकॉज नसा होऊ शकतात. पण सर्वात प्रभावित नसा या तुमच्या पायात आणि पंजांमध्ये असतात. त्यामुळेच उभे झाल्यावर आणि जास्त चालत राहिल्याने तुमच्या शरीराच्या खालच्या भागावर दबाव वाढतो. व्हेरिकॉज नसा या कधी कधी निळ्या किंवा हिरव्या रंगांच्या दिसतात. या नसांवर खूप जास्त दबाव पडल्यास समस्या गंभीर होऊ शकते.
4) पॅरालिसिस
जेव्हा तुम्ही पायांना क्रॉस करुन बराचवेळ बसता तेव्हा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. याला पेरोनेल नर्व्ह पाल्सी असेही म्हणतात. नसांवर अधिक दबाव पडल्यास ही समस्या होण्याची शक्यता असते.