झोपण्यापूर्वी मोबाईल चेक करत असाल तर जाणून घ्या या गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 04:41 PM2018-09-26T16:41:11+5:302018-09-26T16:48:51+5:30
स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे. चॅंटिग, कॉल, व्हिडीओ कॉल आणि इतरही काही कामांसाठी फोनचा वापर केला जातो.
स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे. चॅंटिग, कॉल, व्हिडीओ कॉल आणि इतरही काही कामांसाठी फोनचा वापर केला जातो. पण अलिकडे लोकांना स्मार्टफोनची सवय लागल्याचे बघायला मिळत आहे. आता तर लोक नेहमीच रात्री झोपतानाही फोनचा वापर करतात, पण काय तुम्हाला हे माहीत आहे की, हे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ रात्री फोनचा वापर केल्याने काय नुकसान होतात.
डोळ्यांची दृष्टी कमी होते
काही लोकांना सवय असते की, ते रात्री झोपण्यापूर्वी फोन एकदा चेक करतातच आणि या नादात ते बराचवेळ फोनमध्येच घालवतात. रात्री फोनचा वापर केल्याने डोळ्यांची दृष्टीवर वाईट प्रभाव पडतो, याने आरोग्यासंबंधी समस्याही निर्माण होतात. रात्रीच्या अंधारात जेव्हा फोनचा वापर केला जातो तेव्हा फोनच्या प्रकाशाचा डोळ्यांवर प्रभाव पडतो.
(Image Credit : www.abc.net.au)
झोप कमी होते
रात्री फोनचा वापर केल्याने शरीरात निर्माण होणारे मिलेटोनिन हार्मोन्सवरही वाईट प्रभाव पडतो. हे हार्मोन झोपेसाठी मदत करतात, पण रात्री फोनच्या वापराने या हार्मोनचा स्त्राव कमी होत जातो. ज्या कारणाने झोपही कमी होते.
कॅन्सरचा धोका
ही धक्कादायक पण खरी बाब आहे. स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश मिलेटोनिन हार्मोनला प्रभावित करतो. या हार्मोनमध्ये अॅंटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात, ज्या कॅन्सरच्या पेशींसोबत लढण्यास मदत करतात. हे हार्मोन जेव्हा कमी होतात तेव्हा ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
(Image Credit : www.businessinsider.in)
स्मरणशक्ती कमी होते
रात्री फोनचा अधिक वापर केल्याने मेंदुसोबतच स्मरणशक्तीमध्येही फरक पडतो. सतत असे केल्याने स्मरणशक्ती कमी होऊ लागते. रात्री अधिक फोन वापरल्याने झोपेवर वाइट परिणाम होतो आणि जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा बॉडी मेटाबॉलिज्म प्रभावित होतं आणि मेंदुमध्ये होणारा ब्लड फ्लो सुद्धा प्रभावित होतो.
चिडचिड वाढते
रात्री फोन वारल्याने झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे शरीर व डोळ्यांना आराम मिळत नाही. या कारणाने चिडचिडपणा स्वाभाविकपणे वाढतो. चिडचिड वाढल्याने इतरही समस्या वाढतात.
डिप्रेशनचा धोका
फोनचा अधिक वापर केल्याने स्ट्रेस आणि डिप्रेशनची समस्याही होऊ शकते. काही लोक रात्रीही सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात, कुणी काय स्टेटस टाकलं, आपलं स्टेटस किती लोकांनी लाइक केलं हे सतत चेक करत असतात. जेव्हा फार वेळपर्यंत काही अपडेट मिळत नाही तेव्हा डिप्रेशनसोबतच स्ट्रेसही येतो.