शरीरात 'हे' संकेत दिसताच वेळीच व्हा सावध, असू शकते हायपरटेंशनची समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:48 PM2024-08-27T15:48:52+5:302024-08-27T16:27:02+5:30
Hypertension : हायपरटेंशन या समस्येला सायलेंट किलरही म्हटलं जातं. कारण काही लोकांमध्ये ही समस्या कोणत्याही स्थितीत होते आणि हे चांगलंच महागात पडू शकतं.
Hypertension : हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनची समस्या आजकाल खूप लोकांना होत आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांमधून वाहणारं रक्त धमण्यांच्या आतील बाजूवर दबाव टाकतं. जास्त दबावामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे हायपरटेंशन होण्याचा धोका वाढतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, पुरूषांमध्ये हायपरटेंशनची समस्या २४ टक्के आणि महिलांमध्ये २१ टक्के आढळून आली आहे.
हायपरटेंशन या समस्येला सायलेंट किलरही म्हटलं जातं. कारण काही लोकांमध्ये ही समस्या कोणत्याही स्थितीत होते आणि हे चांगलंच महागात पडू शकतं. अशात तुम्हाला हायपरटेंशन, याची लक्षणे, संकेत याबाबत माहिती असली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला वेळीच योग्य ते उपचार करता येतील.
डोकेदुखी
डोकेदुखी वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकते. पण ही समस्या हायपरटेंशनचं एक कॉमन लक्षण आहे. अशात डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार घ्यावे.
दम लागणे
पायऱ्या चढताना, एक्सरसाईज करताना, धावताना किंवा एखादं काम करताना श्वास भरून येत असेल तर हाही हायपरटेंशनचा संकेत असू शकतो.
चक्कर येणे
हाय ब्लड प्रेशरमुळेही डोकं वाटणे किंवा सतत चक्कर येणे या समस्या होतात. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
छातीत सतत वेदना
शारीरिक हालचाल करताना किंवा एखादं काम करताना छातीत वेदना किंवा अस्वस्थ वाटणं हा हायपरटेंशनचा संकेत असू शकतो. जास्त विचार केल्याने सुद्धा असं होतं. जास्त विचार केल्याने मानसिक तणाव वाढतो आणि यामुळे ब्लड प्रेशरही वाढतं. या स्थितीत चक्कर येणे किंवा डोकं जड वाटणे अशी लक्षण दिसू शकतात.
धुसर दिसणे
हाय ब्लड प्रेशरमुळे अनेक रेटिनल म्हणजे डोळ्यांच्या आतील काही नसा डॅमेज होत असतात. ज्यामुळे तुम्हाला धुसर दिसतं.
हाय बीपीची इतर लक्षणं
हृदयाची धडधड वेगाने होणे, सतत थकवा आणि बेशुद्ध पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाकातून रक्त येणे ही हायपरटेंशनची लक्षणं आहेत.
हायपरटेंशनची कारणे काय आहेत?
- अल्कोहोलचं अधिक सेवन करणे
- मिठाचं अधिक सेवन
- एक्सरसाइज न करणे
- आहारात फळ किंवा भाज्यांची कमतरता
- कॉफी किंवा चहाचं अधिक सेवन
- धुम्रपान करणे
- वजन वाढलेलं असणे
- तणाव असणे
- चरबी अधिक असलेले पदार्थ खाणे
- आनुवांशिकता
कसा कराल कंट्रोल?
- वजन वाढण्यासोबतच हायपरटेंशन वाढतं. जर वजन अधिक असेल तर झोपताना श्वासासंबंधी समस्याही होतात, याला स्लीप एप्निया असं म्हणतात. याने हायपरटेंशन अधिक वाढतं. वजन कमी करणे हे हायपरटेंशनला नियंत्रणात ठेवण्याचं सर्वात चांगलं माध्यम आहे.
- दिवसातून ३० ते ६० मिनिटे एक्सरसाइज करा. याने मूडही चांगला राहतो आणि तुम्ही फिट राहता. याने मधुमेह आणि इतर हृदयरोगांचा धोका कमी होतो.
- हायपरटेंशन कमी करण्यासाठी आहारात बदल करावा. फळं, भाज्या आणि कडधान्याचं सेवन करा. तसेच लो फॅट डेअरी पदार्थांचं सेवन करा.
- हायपरटेंशन कमी करण्यासाठी सोडियमचं कमीत कमी सेवन करा. जास्त सोडियममुळे शरीरात द्रव्य तयार सुरू होतं. याने ब्लड प्रेशर अधिक वाढतं.
- मद्यसेवन अधिक केल्याने रक्तदाबासंबंधी समस्या होतात. त्यामुळे मद्यसेवन कमी करा.
- तणावामुळे हायपरटेंशन अधिक वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी होणारा तणाव कमी करण्याकडे लक्ष द्यावं.
- धुम्रपानामुळे रक्तदाब वाढतं. त्यामुळे धुम्रपान करू नका. धुम्रपान सोडल्यास हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.