COPD मुळे फुप्फुसं होतात डॅमेज, 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 11:04 AM2024-11-18T11:04:41+5:302024-11-18T11:05:14+5:30

COPD Symptoms : ही समस्या सामान्यपणे जास्त काळ धुम्रपान केल्याने किंवा जास्य वायु प्रदुषण असलेल्या हवेत श्वास घेतल्याने होते. त्याशिवाय अनुवांशिक कारणेही सुद्धा ही समस्या होते. 

Signs and symptoms of chronic obstructive pulmonary disease or COPD | COPD मुळे फुप्फुसं होतात डॅमेज, 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

COPD मुळे फुप्फुसं होतात डॅमेज, 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

Chronic Obstructive Pulmonary Disease (COPD) Symptoms: COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज फुप्फुसांचा एक गंभीर आजार आहे. एक अशी स्थिती ज्यात फुप्फुसांवर सूज येते आणि श्वासनलिका लहान होते. ज्यामुळे श्वसनक्रियेत अडथळा येतो आणि श्वास घेण्यास समस्या होते. ही समस्या सामान्यपणे जास्त काळ धुम्रपान केल्याने किंवा जास्य वायु प्रदुषण असलेल्या हवेत श्वास घेतल्याने होते. त्याशिवाय अनुवांशिक कारणेही सुद्धा ही समस्या होते. 

ही एक क्रॉनिक समस्या आहे म्हणजे एकदा जर तुम्हाला ही समस्या झाली तर पूर्णपणे ती दूर करता येत नाही. ही समस्या औषधे, लाइफस्टाईल आणि आहारातून फक्त कंट्रोल केली जाऊ शकते. सीओपीडी झाल्यावर फुप्फुसं कमजोर होतात. जर वेळीच यावर उपचार केले गेले नाही तर जीव जाण्याचा धोकाही वाढतो. सीओपीडी झाल्यावर शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. जर वेळीच ही लक्षणं ओळखली तर या समस्येपासून बचाव करता येतो. चला जाणून घेऊ या आजाराची लक्षणे...

श्वास घेण्यास समस्या

सीओपीडीचं सगळ्यात सामान्य लक्षण म्हणजे श्वास घेण्यास समस्या होणे. ही समस्या तुम्हाला शारीरिक हालचाल करताना किंवा आराम करतानाही जाणवू शकते. जर तुम्हाला असं काही लक्षण दिसत असेल तर वेळीच एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. 

सतत खोकला येणे

जर तुम्हाला दिवसा सतत खोकला येत असेल, तर हेही सीओपीडीचं लक्षण असू शकतं. खासकरून जर सकाळी खोकल्यासोबत पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा कफही येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. अशा स्थितीत वेळीच डॉक्टरांना दाखवून योग्य ते उपचार केले पाहिजे.

श्वास घेताना भीती किंवा शिटीसारखा आवाज

श्वास घेताना शिटीसारखा आवाज किंवा घाबरल्यासारखं वाटत असेल तर हे क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीजचं लक्षण असू शकतं. त्याशिवाय या स्थितीत लोकांना छातीत जडपणाही जाणवतो. जर तुम्हाला असं काही होत असेल तर वेळीच सावध व्हा.

अचानक वजन कमी होणे

कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होणंही सीओपीडीचा संकेत असू शकतो. जर खाणं-पिणं बरोबर असूनही वजन वेगाने कमी होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. यामागे आणखीही काही कारणे असू शकतात. अशात योग्य कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थकवा आणि कमजोरी

पुरेसा आराम केल्यावरही तुम्हाला सतत थकवा किंवा कमजोरी जाणवत असेल तर हा सीओपीडीचा संकेत असू शकतो. जेव्हा श्वासनलिकेत सूज येते तेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन पोहोचत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते. असा काही संकेत दिसत असेल तर वेळीच सावध व्हा.

Web Title: Signs and symptoms of chronic obstructive pulmonary disease or COPD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.