Nipple Dermatitis : महिलांना होणाऱ्या निप्पल्स डर्मेटाइटिस 'या' गंभीर आजाराची लक्षणं आणि कारणं जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:55 AM2020-01-15T11:55:38+5:302020-01-15T12:05:37+5:30
Nipple Dermatitis : महिलांना बदलत्या वातावरणात आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात.
महिलांना बदलत्या वातावरणात आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. त्यातल्या त्यात प्राईव्हेट पार्टंसना खाज यायला सुरूवात होते. अशा भागांना खाज आल्यानंतर खूप अवघडल्यासारख होतं असतं. सतत येणारा घाम, घट्ट कपड्यामुळे खाज येते. आपण अनेकदा समस्यांकडे दुर्लक्ष करत असतो. पण याच समस्याचं रुपांतर मोठ्या आजारांत होत असतं. कारण महिलांना छातीच्या टोकांवर म्हणजेच निपल्सवर जास्त खाज येत असेल तपासणी करणं गरजेचं आहे. कारण यामुळे आजाराची लागण झाल्यास ऑपरेशन सुद्धा करावं लागू शकतं. अशी परिस्थिीती उद्भवू नये म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज असते. चला तर मग जाणून घेऊया निप्पल्सवर येणारी खाज कशी महागात पडू शकते.
महिलांची त्वचा ही मुलायम असते. शरीराचे काही भाग संवेदनशील असतात. ज्यात छाती, निप्पल्स यांचा समावेश असतो. अनेकदा छातीवर निप्पल्सच्या भागात लाला चट्टे येणे, लहान पुळ्या येणे तसंच खाज येण्याची समस्या उद्भवत असते. अनेक महिला हा त्रास घामामुळे होत आहे असं समजून दुर्लक्ष करतात. पण ही लक्षणं 'निप्पल डर्मेटाइटिस' ची सुद्धा असू शकतात.
निप्पल डर्मेटाइटिसची लक्षणं आणि कारणं.
निप्पल्स डर्मेटाइटिस हा आजार एक किंवा दोन्ही स्तनांना सुद्धा होऊ शकतो. यामुळे निप्पल्सच्या त्वचेवर लहान-मोठे डाग, रॅशेज येतात. त्यामुळे पॅचेस येतात. त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज जास्त येतेय. तर तुम्ही त्या भागावर जास्त खाजवत असाल तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. (हे पण वाचा-हॉट आणि स्लिम फिगरसाठी मलायका अरोरा सांगतेय खास फिटनेस फंडा!)
निप्पल डर्मेटाइटिस का होतो
सर्वसाधारणपणे निप्पल डर्मेटाइटिस अशा लोकांना होतो. ज्यांचा त्वचा खूप संवेदनशील असते. अनेकदा स्किनकेअर प्रोडक्टसच्या वापरामुळे तसंच सिन्थेटीक कपड्यांमुळे एलर्जी होते. ज्या महिला स्तनपान करत असतात त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. (हे पण वाचा-रोजच्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता गंभीर आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध)
कशी घ्याल काळजी
गरम पाण्यात एखादा कपडा किंवा टॉवेल भिजवून निप्पल्स साफ करा.
इन्फेक्शन झाले असल्याल साबणाचा वापर कमी करा. कारण त्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते.
तुमच्या स्तनांमध्ये खाज येत असेल किंवा स्त्राव होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच योग्य उपचार करा.