'या' गोष्टींवरून मिळतात किडनी सिस्ट झाल्याचे संकेत, जाणून घ्या काय आहे ही समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:28 AM2024-05-13T10:28:58+5:302024-05-13T10:29:33+5:30
Kidney Cyst Symptoms : या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. किडनी सिस्ट झाल्यावर शरीर वेगवेगळे संकेत देतं. चला जाणून याबाबत आणखी काही....
Kidney Cyst Symptoms : किडनी सिस्ट एक अशी समस्या आहे ज्यात किडनीवर पाण्याने किंवा ठोस पदार्थ भरलेले फोड येतात. हे फोड किडनी किंवा त्याच्या आसपास होतात. बऱ्याच लोकांना ही समस्या काय आहे याबाबत माहीत नसतं. जर जास्त काळ या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर इन्फेक्शनही होऊ शकतं. तसेच इतर अवयवही प्रभावित होऊ शकतात. अशात या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. किडनी सिस्ट झाल्यावर शरीर वेगवेगळे संकेत देतं. चला जाणून याबाबत आणखी काही....
किडनी सिस्टचे लक्षण
एक्सपर्ट सामान्यपणे किडनी सिस्ट अनेकदा कोणत्याही प्रकारचे संकेत देत नाही. जर त्यांना इन्फेक्शन झालं तर शरीरात काही लक्षण दिसू लागतात. मुख्यपणे किडनी सिस्ट जर फुटले किंवा मोकळे झाले तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. किंवा ते इतके मोठे होतात की, पोटात इतर कोशिका आणि अवयवांवर दबाव टाकतात.
कंबर आणि पासोळ्यांच्या मधे वेदना
पाठीत जास्त वेदना होणे
कधी-कधी ताप येणे
पुन्हा पुन्हा लघवी लागणे
लघवीतून रक्त किंवा गर्द रंगाची लघवी
किडनी सिस्ट कुठे झालंय यावर हे अवलंबून असतं की, किडनीचं काम कसं प्रभावित होऊ शकतं. जर सिस्ट किडन्यांनातुमच्या रक्तातील अतिरिक्त तरल पदार्थ फिल्टर करण्यास रोखत असेल तर यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते.
किडनी सिस्ट होण्याची कारणे?
डॉक्टर याबाबत सांगतात की, एखाद्या किडनी सिस्ट तेव्हा होतो जेव्हा नेफ्रॉनची नलिका फुगू लागते आणि तरल पदार्थ त्यात भरू लागतात. या समस्येची नेमकं कारणं अजून स्पष्ट नाहीत. पण काही जेनेटिक कारणांमुळे किडनी सिस्ट होऊ शकतो.
उपाय
जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त किडनी सिस्ट झाले असतील तर त्या व्यक्तीने सगळ्यात आधी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. सुरूवातीच्या लक्षणांवर आधारीत डॉक्टर उपचार करू शकतात. पण गंभीर स्थिती उद्भवल्यास स्क्लेरोथेरेपीचा वापर करून किडनीमधील पाण्याने भरलेले फोट काढून टाकले जातात. किडनीत झालेल्या सिस्टचं प्रमाण जास्त असेल तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.