'या' लक्षणांवरून ओळखा तुमचं मुल तणावात तर नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:35 PM2019-01-02T17:35:23+5:302019-01-02T17:40:27+5:30
सध्या अनेक व्यक्तींमध्ये तणावाची समस्या आढळून येते. पण त्यातल्यात्यात चिंतेची बाब म्हणजे, लहान मुलांमध्ये वाढणारी तणावाची समस्या. अनेकदा अभ्यासाचा वाढता ताण आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वागणूकीमुळे मुलांमध्ये ही समस्या उद्भवते.
सध्या अनेक व्यक्तींमध्ये तणावाची समस्या आढळून येते. पण त्यातल्यात्यात चिंतेची बाब म्हणजे, लहान मुलांमध्ये वाढणारी तणावाची समस्या. अनेकदा अभ्यासाचा वाढता ताण आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वागणूकीमुळे मुलांमध्ये ही समस्या उद्भवते. चिंता, तणाव आणि डिप्रेशन या लहान मुलांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत. कधी-कधी, आई-वडिल मुलांवर इतका दबाव आणतात, त्या दबावाखाली येऊन मुलं तणावाची शिकार होतात. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्यामुळे यामध्ये टिकून राहण्यासाठी मुलं सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त मुलांमध्ये याच कारणांमुळे तणावसारख्या समस्या दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात बदल होतात. जाणून घेऊया अशा काही लक्षणांबाबत ज्यावरून मुलं तणावामध्ये असल्याचे समजते.
ही लक्षणं सांगतात तुमची मुली तणावामध्ये आहेत :
झोप न लागणं
मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांमध्येही तणावामुळे अनिद्रेची समस्या दिसून येते. जर तुमचं मुल तणावग्रस्त असेल तर ते रात्री नीट झोपू शकत नाही. एखाद्या वेळी जर त्यांना झोप लागलीच तर काही वाईट स्वप्नांचा त्यांना सामना करावा लागतो.
सतत चिडचिड करणं
मुलं सतत तणावामध्ये असल्यामुळे त्यांना सतत राग येतो. ते आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांना ते जमत नाही. परिणामी ते सतत चिडचिड करू लागतात. तुमचंही मुल सतत चिडचिड करत असेल तर त्यांना समजून घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करा.
नखं चावणं
जेव्हा आपण तणावामध्ये असतो त्यावेळी आपण आपली नखं चावतो. लहान मुलांसोबतही काहीसं असंच होतं. जेव्हा मुलं तणावामध्ये असतात किंवा चिंतेत असतात, तेव्हा ते आपली नखं खातात.
खाण्याच्या सवयींमध्ये बदल
जर तुमचं मुल खूप जास्त जेवत असेल किंवा काहीच खात नसेल तर समजून जा की, तुमचं मुल तणावामध्ये आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.
मूड स्विंग्ज
लहान मुलांना अनेकदा मूड स्विंग्ज होत असतात. जर तुमच्या मुलांना सतत मूड स्विंग्ज होत असतील तर समजून जा की, ते तणावाखाली वावरत आहेत. अशावेळी त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी बोला.