शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झाल्यास दिसतात ही ४ लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 11:46 AM2018-10-25T11:46:53+5:302018-10-25T11:47:06+5:30

एक्सरसाइज आणि डाएटनंतरही तुम्हाला वजन कमी करण्यास अडचण येत असेल तर अनेकांना निराशा येते. कारण असे का होत आहे यांचं त्यांना उत्तरच मिळत नाही.

Signs you have a slow metabolism | शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झाल्यास दिसतात ही ४ लक्षणे!

शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झाल्यास दिसतात ही ४ लक्षणे!

एक्सरसाइज आणि डाएटनंतरही तुम्हाला वजन कमी करण्यास अडचण येत असेल तर अनेकांना निराशा येते. कारण असे का होत आहे यांचं त्यांना उत्तरच मिळत नाही. एक्सपर्टनुसार, या कारणाने तुमचं मेटाबॉलिज्म कमी होतं. चला जाणून घेऊ मेटाबॉलिज्म कमी झालं हे कसे ओळखाल.

मेटाबॉलिज्म म्हणजे काय?

मेटाबॉलिझ्म म्हणजे चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि शरीरात पेशी तयार होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटकांचेदेखील नियंत्रण केले जाते.

१) सतत होणारी अंगदुखी 

जर तुम्हाला सतत मांसपेशी आणि शरीरात वेदना होत असतील तर तुमच्या थायरॉईड ग्रंथी योग्य काम नसाव्यात असं होऊ शकतं. थायरॉयड ग्लॅंड योग्य प्रकारे काम करत नसल्यानेही मेटाबॉलिज्म कमी होतं. त्यामुळे सतत होणाऱ्या अंगदुखीकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म रेट स्लो होतं तेव्हा तुम्हाला प्रत्येकवेळी थकवा जाणवायला लागेल. मेटाबॉलिज्म स्लो झाल्याने तुमच्यात शारीरिक संबंध ठेवण्याचीही इच्छा होणार नाही. त्यामुळे आहारात मेटाबॉलिज्म रेट वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे योग्य ठरेल. दिवसातून काही वेळा थोड्या थोड्या वेळाने हे पदार्थ खावेत. 

३) पोटाचा आकार कमी न होणे

जेव्हा शरीराचं मेटाबॉलिज्म रेट कमी होतो तेव्हा जास्त काही न खाताही तुमच्या पोटाचा घेर वाढू लागतो. अशात वजन कमी करण्याचे सर्व प्रयोग निकामी ठरत असल्याचं दिसतं. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की, अचानक तुमचं वजन वाढलं आहे तर वेळीट मेटाबॉलिज्म रेट तपासून घ्यावा.  

४) भूक न लागणे

जर तुम्हाला सकाळी नाश्त्यावेळ भूक लागत नसेल आणि तुम्ही दुपारच्या जेवणापर्यंत काही न खाता सहज राहू शकता. तर तुमचा मेटाबॉलिज्म रेट स्लो झाला आहे. 
 

Web Title: Signs you have a slow metabolism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.