असे तीन संकेत जे सांगतात हाडांमध्ये पसरला आहे कॅन्सर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 10:38 AM2022-11-07T10:38:14+5:302022-11-07T10:38:35+5:30
इतर कॅन्सरप्रमाणे बाउल कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा कोलन, मोठी आतडी आणि रेक्टममधील कोशिका अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात.
बाउल कॅन्सरला आतड्याचा कॅन्सरही म्हटलं जातं. जगात तिसरा सगळ्यात जास्त होणारा हा कॅन्सर आहे. या आजाराची सुरूवात आतड्यांच्या आतील बाजूपासून होते आणि हळूहळू ही समस्या वाढून शरीराच्या इतर अवयवांमध्ये पोहोचते. 2020 मध्ये 1.9 मिलियनपेक्षा जास्त बाउल कॅन्सरच्या केसेस समोर आल्या होत्या. इतर कॅन्सरप्रमाणे बाउल कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा कोलन, मोठी आतडी आणि रेक्टममधील कोशिका अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात.
बाउल कॅन्सर शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरू शकतो का?
वेळेवर या कॅन्सरबाबत माहिती मिळत नसल्याने हा घातक ठरू शकतो. इतकंच काय तर तुमचा जीवही जाऊ शकतो. याचीही शक्यता राहते की, कॅन्सर लिव्हर, फुप्फुसं, मेंदू, पेरिटोनियम किंवा लिम्फ नोड्ससहीत शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरू शकतो. जेव्हा हा कॅन्सर शरीराच्या इतर अवयवांमध्ये वाढू लागतो तेव्हा याला अॅडव्हांस बाउल कॅन्सर म्हटलं जातं.
हा कॅन्सर हाडांमध्ये पसरतो तेव्हा काय होतं?
हे क्वचितच होतं. पण बाउल कॅन्सर तुमच्या हाडांमध्ये पसरू शकतो. ज्याला बोन मेटास्टेसिस नावाने ओखळलं जातं. मेयो क्लीनिकनुसार, हा तेव्हा होतो जेव्हा ओरिजिनल ट्यूमरपासून कॅन्सर सेल्स तुटून वेगळे होतात आणि हाडांमध्ये पसरतात. हाडांमध्ये पोहोचून या कॅन्सर सेल्स वाढू लागतात.
संकेत आणि सेंसेशन
कॅन्सर रिसर्च यूकेने तीन असे सेंसेशन आणि इशाऱ्यांबाबत सांगितलं ज्यावरून हे जाणून घेता येतं की, कॅन्सर आपल्या हाडांमध्ये पसरला आहे.
थकवा
आजारी असल्यासारखं वाटणं
पुन्हा पुन्हा तहान लागणे
कॅन्सर किंवा ट्यूमर जेव्हा तुमच्या हाडांमध्ये पसरतो तेव्हा याने हाडे डॅमेज किंवा खूप कमजोर होऊ लागतात. सोबतच यामुळे हाडांमध्ये खूप जास्त वेदना होऊ लागतात.
बाउल कॅन्सरची सुरूवातीची लक्षण
नॅशनल हेल्थनुसार, बाउल कॅन्सरची लक्षण फार कमी दिसू शकतात आणि असंही नाही की, तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटेल. तरी काही लक्षण पुढील आहेत.
बाउल हॅबिट्समध्ये बदल
पाइल्सची लक्षण नसताना विष्ठेतून रक्त येणे
पोटदुखी, अस्वस्थ वाटणे आणि ब्लोटिंग