Silent heart attack : सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष करण पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 01:07 PM2022-09-12T13:07:45+5:302022-09-12T13:08:26+5:30

Silent Heart Attack symptoms : अनेक लोकांना वाटतं की, जेव्हा हार्ट अटॅक येईल तेव्हा त्यांच्या छातीत जोरात वेदना होतील आणि त्यांना कळेल की, त्यांना हार्ट अटॅक आलाय. पण अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणांशिवायही अचानक येत असतो.

Silent heart attack : Signs of heart attack precaution and symptoms of silent heart attack | Silent heart attack : सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष करण पडू शकतं महागात!

Silent heart attack : सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष करण पडू शकतं महागात!

googlenewsNext

Silent Heart Attack symptoms : जर तुम्हाला हार्ट अटॅक(Heart Attack) येणार असेल तर तुम्हाला कसं कळणार? सामान्यपणे आपण सिनेमांमध्ये पाहिलं असतं की, हार्ट अटॅक आल्यावर छातीत जोरात वेदना होतात, खोकला येतो आणि व्यक्ती जमिनीवर पडतो. पण हे काही गरजेचं नाही की, हार्ट अटॅक नेहमी काहीतरी संकेत देऊनच येईल. त्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही वेळोवेळी तुमचं चेकअप करावं. डायबिटीस, हायपरटेंशन आणि लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

अनेक लोकांना वाटतं की, जेव्हा हार्ट अटॅक येईल तेव्हा त्यांच्या छातीत जोरात वेदना होतील आणि त्यांना कळेल की, त्यांना हार्ट अटॅक आलाय. पण अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणांशिवायही अचानक येत असतो. याला सायलेन्ट हार्ट अटॅक म्हटलं जातं. याआधी तुमच्यात काही लक्षणे दिसतात, ज्यांवर वेळीच लक्ष देऊन उपचार घेतले पाहिजेत. 

छातीत प्रेशर

जर तुमच्या छातीत ब्लॉकेज असतील तर तुम्हाला छातीत दबावाची जाणीव होईल. अशात छातीत वेदना आणि प्रेशरही जाणवू शकतं. जर अशी काही लक्षणे दिसत असतील तर तुमच्यासाठी चिंतेची बाब आहे.

हात आणि खांदेदुखी

छातीत कळ येणे आणि खांदा-हाताकडे वेदना हळूहळू वाढत जाणे हार्ट अटॅकचं लक्षण आहे. अशात अनेकदा असंही होतं की, छातीत काही वेदना होत नाहीत. पण खांदे किंवा हातांमध्ये वेदना होते.

अचानक कमजोरी

जर तुम्हाला अचानक चक्कर येत असेल किंवा तुम्हाला नीट उभंही राहता येत नाही अशी कमजोरी वाटत असेल, तर वेळीच आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना द्या आणि डॉक्टरांना बोलवण्यास सांगा.

जबड्यामध्ये वेदना

नेहमीच जबड्यामध्ये किंवा घशात थंडी आणि सेंन्सिटीव्हिटीमुळे वेदना होतात. पण जर छातीत्या मधोमध वेदना होत असेल आणि हा त्रास हळूहळू जबड्याकडे सरकत असेल तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.

पाय आणि तळपायावर सूज

जर तुमच्या पायांवर सूज असेल तर याचा अर्थ होतो की, हार्ट योग्यप्रकारे ब्लड पंप करू शकत नाहीये. हार्ट फेलिअरच्या आधी किडनी कमजोर होऊ लागते. ज्यामुळे पायांवर सूज येते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Silent heart attack : Signs of heart attack precaution and symptoms of silent heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.