साधा खोकलाच तर आहे, म्हणून दुर्लक्ष केलंत तर पडू शकतं महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:38 PM2017-11-01T13:38:13+5:302017-11-01T13:38:52+5:30

तरुणांमध्येही वाढतोय दम्याचा विकार. जागतिक आरोग्य संघटनेचा सावधानतेचा इशारा.

A simple cough is there, can lead to TB | साधा खोकलाच तर आहे, म्हणून दुर्लक्ष केलंत तर पडू शकतं महागात!

साधा खोकलाच तर आहे, म्हणून दुर्लक्ष केलंत तर पडू शकतं महागात!

googlenewsNext
ठळक मुद्देसाधा खोकला आहे म्हणून दुर्लक्ष करू नका.खोकल्याचंच रुपांतर दम्यात होऊ शकतं.तरुणांमध्येही दम्याचं वाढतंय प्रमाण.

- मयूर पठाडे

साधा खोकला. त्यानं असा काय आणि कितीसा फरक पडतो, असं सगळ्यांना वाटतं, पण याच खोकल्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचं दम्यात रुपांतर होतं आणि मृत्यूलाही ते कारणीभूत ठरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेनंही त्याकडे साºयांचंच लक्ष वेधलं आहे. जगात दम्यानं दगावणाºया लोकांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचा अहवालही जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच दिला आहे. भारतात दम्यामुळे मृत्युमुखी पडणाºया लोकांचीच संख्या केवळ जास्त नाही, जगात दम्याचे सर्वाधिक रुग्णही भारतातच आहेत.
याकडे सर्वसामान्य लोकांबरोबरच सरकारनंही अधिक लक्ष द्यावं असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. मुळात यासंदर्भात आपल्यातच जागृती होणं अधिक गरजेचं आहे. आजार पहिल्या टप्प्यात असताना किंवा तो झाल्याबरोबर त्याकडे वेळीच लक्ष दिलं तर तो वाढत नाही आणि तो पूर्णपणे बराही होऊ शकतो.
कोणता खोकला घातक ठरू शकतो हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. ते कळलं तर त्यावर उपचार करणंही अगदी सोपं आणि सहज आहे.
काय आहेत दम्याची लक्षणं?
१- आपला खोकला जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सुरू असेल तर तातडीनं डॉक्टरांना दाखवावं.
२- खोकल्यातून हिरवा, पिवळा कफ पडत असेल किंवा कधी कधी रक्तही येत असेल तर ते धोक्याचं लक्षण समजावं.
३- याशिवाय वजन झपाट्यानं कमी होतं.
४- खूप थकवा जाणवतो.
५- ताप येतो.
६- रात्रीच्या वेळी घाम येतो.
७- थंडी वाजून येते.
८- छातीत दुखायला लागतं.
९- श्वास घ्यायला त्रास होतो आणि श्वासोच्छवासही जलद होतो.
१० भूक कमी होते.
यासारखी लक्षणं जर आपल्यात दिसत असतील तर तातडीनं योग्य ते उपचार घ्यायला हवेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दम्याच्या रुग्णांमध्ये तरुणांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. याकडे साºयांनीच गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं.

Web Title: A simple cough is there, can lead to TB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.