नवशिक्यांसाठी घरातही करता येईल असा सोप्पा, पण फायदेशीर व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:57 PM2017-12-22T17:57:38+5:302017-12-22T18:00:01+5:30

संपूर्ण शरीरालाच येईल त्यामुळे टोन.

 A simple, easy-to-use exercise at home for beginners | नवशिक्यांसाठी घरातही करता येईल असा सोप्पा, पण फायदेशीर व्यायाम

नवशिक्यांसाठी घरातही करता येईल असा सोप्पा, पण फायदेशीर व्यायाम

ठळक मुद्देघरातल्या घरात आधी थोडा वॉर्म अप करा. त्यानंतर आपल्याला जेवढे झेपेल तेवढे पुशअप्स काढा.पुशअप्स झाल्यानंतर थोडा अ‍ॅबडॉमिनल म्हणजे पोटाचा एक्सरसाइज करावा.आपल्या शरीराच्या खालच्या भागाकडे, पायांकडेही तितकंच लक्ष द्यायला हवं.

- मयूर पठाडे

कारण काहीही असो, पण अनेकांना जिममध्ये किंवा ग्राऊंडवर जाऊन व्यायामला वेळ होत नाही, हे वास्तव आहे. ज्यावेळी आपल्याला वेळ आहे, नेमक्या त्यावेळी जिम बंद असतात, ग्राऊंडवर कोणीच नसतं किंवा आपल्याला सोयीची जी वेळ असते, त्यावेळी बाहेर कुठे जाऊन व्यायाम करायचं म्हटलं तर आपल्यालाच फार आॅकवर्ड वाटतं.
मग त्यासाठी घरच्या घरी काही उत्तम उपाय आहे का?
गेल्या भागात आपण त्यासाठीचे काही व्यायामप्रकार पाहिले. या भागात आता आणखी काही माहिती..
घरातल्या घरात आधी थोडा वॉर्म अप करा. हातपाय हलवण्यापासून, तर जागेवरच उड्या मारण्यापर्यंत काहीही करता येईल. त्यानंतर आपल्याला जेवढे झेपेल तेवढे पुशअप्स काढा.
महिला आणि पुरुष दोघांनाही याचा चांगला फायदा होईल.
पुशअप्समुले आपल्या हाताचे ट्रायसेप्स, बायसेप्स आणि त्याचबरोबर चेस्ट मसल्सचा टोनही सुधारेल. अनेकांना, विशेषत: महिलांना आपल्या पोटाची खूपच काळजी असते. त्यामुळे पुशअप्स झाल्यानंतर थोडा अ‍ॅबडॉमिनल म्हणजे पोटाचा एक्सरसाइज करावा. चेस्ट मसल्स टार्गेट करण्यासाठी आपल्याला जमतील तेवढे डिप्स मारावेत. अर्थातच सुरुवातीला कोणताही आततायीपणा नको. नाहीतर अंग दुखायला लागतं आणि त्यामुळेच मग बरेच जण आपल्या व्यायामाचा श्रीगणेशा अकालीच संपवतात.
आपल्या शरीराच्या खालच्या भागाकडे, पायांकडेही तितकंच लक्ष द्यायला हवं. मांड्यांसाठी लंजेस आणि पोटºयांसाठी, भिंतीचा वगैरे आधार घेऊन पायाच्या बोटांवर उभं राहून पोटºयांना ताण द्यावा.
अप्पर बॉडी, लोअर बॉडी आणि अ‍ॅबडॉमिनल एक्सरसाइजेसामुळे तुमच्या शरीराचा संपूर्ण व्यायाम होईल. तुमच्यात जर अजून एनर्जी शिल्लक असेलच, तर हेच रिपिटेशन पुन्हाही करता येईल. पण अर्थातच हा व्यायाम नवशिके आणि व्यायामाला नुकतीच सुरुवात केलेल्यांसाठी आहे.

Web Title:  A simple, easy-to-use exercise at home for beginners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.