वाढणाऱ्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ऋजुता दिवेकरांच्या खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 03:32 PM2019-11-05T15:32:01+5:302019-11-05T15:32:44+5:30
वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क हाच एकमेव उपाय नाहीतर शरीराला वायूप्रदूषणापासून वाचवण्यासाठी इतर उपाय करणंही गरजेचं आहे.
दिल्लीत प्रदूषणाचा स्तर एवढा वाढला आहे की, भारताची राजधानी असलेल्या या शहरात 'हेल्थ एमरजेन्सी' घोषित करण्यात आली आहे. वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क हाच एकमेव उपाय नाहीतर शरीराला वायूप्रदूषणापासून वाचवण्यासाठी इतर उपाय करणंही गरजेचं आहे. स्मॉग किंवा वायूप्रदूषणाचा स्तर विषारी वायूंमुळे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. अशातच योग्य आहार आणि घरगुती उपाय करणं आवश्यक असतं. आज आम्ही सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांच्या काही स्पेशल हेल्थ टिप्स सांगणार आहोत.
सुंठ, गुळ आणि शुद्ध तुपाचे लाडू
सुंठ, गुळ आणि शुद्ध तुप सारख्याच प्रमाणात एकत्र करून व्यवस्थित एकजीव करा. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे लाडू तयार करा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी एका लाडूचं सेवन करा. जर तुम्ही जास्त वेळ बाहेर राहत असाल तर घरी आल्यानंतर लेगच याचं सेवन करा.
फायदे
- ताप आणि सूज यांपासून बचाव करण्यासाठी करतं मदत.
- नाक आणि सायनस स्वच्छ ठेवतं.
- पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी
ऊसाचा रस प्या
वायु प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ऊसाचा रस पिणं गरजेचं आहे. ज्यूसऐवजी तुम्ही चावून खाऊ शकता. ऊसाचा रस दुपारच्या वेळी पिणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तुम्ही हा दुपारच्या जेवणा अगोदर किंवा दुपारच्या जेवणानंतर पिऊ शकता.
फायदे
- नियमितपणे ऊसाचा रस प्यायल्याने लिव्हरचं आरोग्य राखण्यास मदत होते. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ऊसाचा रस मदत करतो.
- ऊसामध्ये सुक्ष्म पोषक तत्व असतात. जी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.
- स्मॉग आणि प्रदूषणामुळे होणारी सुस्ती कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठीही उसाचा रस मदत करतो.
दूध, केशर, हळद आणि तुळस
रात्री झोपण्यापूर्वी गरम दूधात केसर आणि हळद एकत्र करून पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. परंतु, प्रदूषणामध्ये आणखी एक गोष्ट एकत्र करू शकता. सकाळच्या वेळी तुळशीची पानं चावल्यानेही फायदा होतो.
फायदे
- केसर शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तसेच त्वाचा आणि केसांना होणारं नुकसान कमी करण्यासाठी मदत करतं.
- इन्फेक्शन, अॅलर्जी आणि ब्लोटिंग यांसारख्या समस्यांवर तुळस गुणकारी ठरते.
- हळद आणि दूधाचं सेवन अत्यंत लाभदायक असतं. शरीराचं रोगांपासून रक्षण करण्यासाठी तसेच आवस्यक ती पोषक तत्व मिळण्यासाठी फायदेशीर ठरतं.
वायू प्रदूषणापासून बचाव करण्याचे उपाय
- जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर प्रदूषणात करणं टाळा. अगदीच आवश्यक असेल तर घरातच काही सोप्या एक्सरसाइज करा.
- मुबलक प्रमाणात पाणी आणि पेय पदार्थांचा सेवन करा. शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
- जर प्रदूषणाचा जास्त त्रास होत असेल तर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 आणि कॅरोटिन सप्लीमेंटचं सेवन करा.