चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:27 PM2017-09-08T16:27:45+5:302017-09-08T16:31:04+5:30
काही पथ्यं पाळा आणि राखा स्वत:ल टवटवीत, फ्रेश..
- मयूर पठाडे
आपलं तारुण्य किंवा आपलं म्हतारपण नेमकं कशावर ठरतं? आपण आता म्हातारे झालो किंवा दिसायला लागलो, असं लोक केव्हा म्हणायला लागतात? म्हातारपणाचं पहिलं लक्षण म्हणजे तुमची स्किन, तुमची त्वचा. आपली त्वचाच आपल्याला पहिल्यांदा सांगते की, तुम्ही कोणत्या दिशेनं जात आहात..
त्यामुळे अनेकजण विशेषत: स्त्रिया आपल्या स्किनची नको तितकी काळजी घेताना दिसतात. पण खरंच ही काळजी नेमकेपणानं घेतलेली असते?
थोडी चौकशी केली, तर लक्षात येईल, स्किनची ही काळजी बºयाचदा सांगोंवांगीच असते. म्हणजे मैत्रीण करते म्हणून मीही करते, जिममधल्या इन्स्ट्रक्टरनं सांगितलं म्हणून मी तसं करायला सुरुवात केली किंवा आजकालच फॅड म्हणजे मोबाइलवर यूट्यूब सुरू करायचं आणि त्यावर ब्यूटी टिप्स, स्किन केअर.. याबद्दलचे व्हीडीओ पाहात बसायचे. तिथे जे सांगितलं जाईल, ते ते इमाने इतबारे करायचं..
पण त्यानं खरंच किती फरक पडतो? बºयाचदा नाहीच.
मग त्यासाठी काय करायचं?
अगदी साधेसोपे, घरच्याघरी करता येतील असे हे उपाय आहेत.
तरुण दिसण्यासाठी काय कराल?
१- स्वत:ला कधीच डिहायड्रेटेड ठेऊ नका. आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं की त्याचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्वचा आक्रसते. त्यावर सुरकुत्या पडतात.
२- ज्या अन्नपदार्थांमध्ये अॅँटीआॅक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत, असे पदार्थ खायला सुरुवात करा. त्यानं तुमच्या वयाच्या वाढीचा वेग कमी होईल आणि त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी होतील. डाळींब, पालक, ग्रीन टी, हिरवी द्राक्षं हे पदार्थ त्यासाठी उपयुक्त ठरतील.
३-रंगीत भाज्या आणि फळं यांचा वापर जेवणात हवाच. रोज आपल्या ताटाकडे बघा. आपल्या जेवणात जितक्या म्हणून रंगीत अन्नपदार्थांचा समावेश करता येईल तेवढा करा.
४- आज आपण जे काही खातो, ते खरोखरच किती पौष्टिक आहे, याविषयी शंकाच आहे. कारण रासायनिक पदार्थांचा वारेमाप वापर त्यात केलेला असतो. त्यामुळे असे पदार्थ खाणं सोडून आधी आॅरगॅनिक फूडकडे वळा.
आपल्या त्वचेचं सौंदर्य त्यामुळे आणखी खुलून दिसेल.
त्वचेच्या सौंदर्याबाबत आणखी माहिती पाहूया पुढच्या भागात..